मनि मॅटर्स : पैसे मिळवणे फार गरजेचे , संपत्तीचा सतत आढावा घ्या


पैसे मिळवणे फार गरजेचे असते त्याचप्रमाणे त्याची नीट गुंतवणुक करणेही गरजेचे असते. सध्या आपल्याकडे असलेल्या पैशांचा योग्यप्रकारे विनियोग करण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झालेली आहे. अर्थात म्हणून कोरोनासारख्या बिकट संकटाने घाबरून न जाता त्याला धैर्याने तोंड देण्यासाठी आर्थिक मोर्चे बांधणी कशी करावी हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या संपत्तीचा आढावा घ्यायला हवा. Money Matters: It is very important to earn money, keep a constant watch on wealth

उदा. आपल्याकडे रिअल इस्टेट, सोने, मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, शेअर, म्युच्युअल फंड, पोस्टाच्या योजना आणि बचत खात्यात किती गुंतवणूक आहे याची नोंद करा. त्यामुळे तुम्हाला आपल्याकडे किती आर्थिक क्षमता आहे याचा आदमास येईल. सध्याच्या परिस्थितीत लिक्विडीटी प्राधान्य द्या म्हणजे फारसे नुकसान न होता आपल्याला किती कॅश उभी करता येईल ते पहा. गरज पडल्यास सरकारने काही सवलती दिल्या आहेत त्याचा लाभ घ्या. म्हणजे घराच्या कर्जाचे हप्ते फेडण्यास मुदत वाढवून दिली आहे. त्याचा उपयोग करा. अर्थात ते हप्ते पुन्हा फेडावे लागणार आहेत त्यामुळे सध्याच्या हप्त्याचे व्याज फेडावेच लागणार आहे हे माहिती असू द्या. त्यामुळे शक्य असेल तर घराचा हप्ता फेडण्यास प्राधान्य द्या. आपल्या खर्चाचे वर्गीकरण करून कोणता खर्च कमी करता येईल, याचे पर्याय तपासून पहा.

उत्पन्न वाढवण्यासाठी इतर पर्याय तपासून पहा. आपल्या स्वतःच्या एफडी, आरडीवर अथवा एनएससीवर कमी व्याजदराने कर्ज काढून जास्त व्याजदराची कर्जे फेडून टाका. उदा. वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डचे कर्ज. फारच निकड पडल्यास आपल्या पीपीएफ किंवा पीएफमधून पैसे उचला. कारण भविष्य निर्वाह निधी हा वृद्धापकाळाची सोय असतो. आरोग्य विम्याचे हप्ते एकरकमी न भरता मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही हप्त्यात भरा. म्युच्युअल फंडात मोठी रक्कम जमा असल्यास सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन नियमित ठराविक रक्कम मिळवू शकता. आवश्यककता असेल तरच म्युच्युअल फंडातील रक्कम काढा अन्यथा त्यात भर घाला. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक निधीचा आढावा घेत पुढे जा.

Money Matters : It is very important to earn money, keep a constant watch on wealth

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण