दिल्लीच्या ईडी पुढून पळून जाणारा “महाराष्ट्र बाणा”…!! राष्ट्रवादी पुन्हा…!!


विनायक ढेरे

ईडीच्या न आलेल्या नोटिशीला देखील ईडीच्या कार्यालयात जाऊन प्रत्युत्तर देण्याची धमकी देणार्‍यांचे राजकीय शिष्य प्रत्यक्ष ईडीच्या नोटिशीला आणि लूकआऊट नोटीस काढेपर्यंत का घाबरतात?? कुठे लपून बसतात?? की पळून जातात?? हेच का त्यांचे शौर्य?? “Maharashtra Bana” fleeing from Delhi’s ED … !! NCP again … !!

हेच ते गृहमंत्री होते, ना जे टीव्ही चँनेलच्या मुलाखतींमध्ये राणा भीमदेवी थाट आणून पोलिसांना काठीला तेल लावून ठेवायला सांगत होते. लॉकडाऊनच्या काळात नुसते कुणी फिरले तर तेल लावलेल्या काठीने जनतेला बडवायला सांगत होते. मग आज ते ईडीच्या या नोटिशीला एवढे का घाबरलेत?? ते समोर जाऊन ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे ईडीच्या तोंडावर का फेकून येत नाहीत??

त्यांनी खरंच काही केले नाही आहे ना?? मुंबईच्या हॉटेल, रेस्टॉरंट, बारमालक यांच्याकडून शंभर कोटींची लाच – खंडणी वसूल केली नाहीये ना?? गोळा केलेली लाच – खंडणी यातला वाटा आपल्या बॉसना पोहोचवला नाहीये ना?? मग एवढे का घाबरायचे?? “कर नाही त्याला डर कशाला?” ही मराठी म्हण त्यांना माहिती नाही का?? त्यांचेच राजकीय गुरु न आलेल्या ईडीच्या नोटिशीला न घाबरता ईडीच्या कार्यालयात जाऊन उत्तर देण्याची धमकी देतात… तर त्यांच्या शिष्योत्तमांना ईडीची नोटीस आल्याची “संधी” प्राप्त झाली असताना ते ईडीला आपल्या राजकीय गुरूंसारखेच तडफदारपणे सामोरे जायला का घाबरत आहेत?? हाच का त्यांचा “ताठ कणा आणि राष्ट्रवादी बाणा??”


अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीची लूकआऊट नोटीस; अनिल देशमुख यांना अटक होणार का ?


आणि गेल्या तेवीस वर्षांमध्ये हेच त्यांच्या राजकीय गुरुंनी त्यांच्यावर “राष्ट्रवादी स्वाभिमानाचे” संस्कार केलेत का?? काय या संस्कारांचा उपयोग झाला?? आज त्यांचे शिष्योत्तम ईडी समोरून पळून जाऊन आपल्या राजकीय गुरूंची प्रतिमा का डागाळत आहेत?? शिष्योत्तमांनी आपल्या राजकीय गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून तडफदारपणे दिल्लीच्या ईडीला सामोरे जाऊन दाखवावेच ना…!! मग बघू ईडी काय वाकडे करते ते…!! हे त्यांनी करूनच दाखवावे ना…!!

त्यांच्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ब्रीद वाक्य लिहिले आहे, “दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे”…!! मग त्यांचे शिष्योत्तम दिल्लीच्या ईडीपुढे ताठ मानेने उभे राहणे तर सोडाच, पण ते ईडी पुढून पळून का जाता आहेत?? याचा अर्थ दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही हे खरेच पण “त्यांचा महाराष्ट्र” पळून जातो…!!, असा घ्यायचा आहे का?? याचा खुलासा अद्याप दिल्ली पुढे न झुकणारे ब्रीद वाक्य लिहिणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी केलेला नाही.

जेव्हा ईडीने नोटीसच काढली नाही, तेव्हा त्याच्यापुढे जाण्याची धमकी देऊन राजकीय नौटंकी करायची आणि प्रत्यक्ष जेव्हा घोटाळ्यांच्या चौकशी आणि तपासाची ईडी नोटीस काढते आणि लूकआऊट नोटीस काढेपर्यंत वेळ येते तेव्हा पळून जायचे…!! हाच का त्यांचा “राष्ट्रवादी महाराष्ट्र बाणा”…??

“Maharashtra Bana” fleeing from Delhi’s ED … !! NCP again … !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण