लाईफ स्किल्स : ऐकताना होतो चार टप्प्यांत विचार


समोरची व्यक्ती बोलत असते त्यावेळी आपण त्याच्याकडे पुर्ण लक्ष आहे असं त्याला भासवत असतो पण तसं नसतं. त्याचे बोलणे कानावर पडत असताना त्याला काय म्हणायचे आहे यापेक्षा जास्त महत्व आपण आपल्याला तो काय बोलला त्याचे आकलन काय झाले या संदर्भावरून ऐकतो. कित्येक वेळा आपण वरवरचेच ऐकतो. समोरच्याच्या म्हणण्याचे आकलन आपण आपल्या पद्धतीने करून घेतो. म्हणूनच कित्येक वेळा एकच वाक्य एकच संदर्भ ती व्यक्ती एकदा दोनदा तिनदा सांगत असते. Life Skills: There are four stages of thinking while listening

कारण त्या व्यक्तीला वाटत असते मला जे काही सांगायचे आहे ते लक्षात येतयं का याची खात्री करावी. हे असे का होते हे जर लक्षात घेतले तर चार मुद्दे महत्त्वाचे लक्षात येतात. ते म्हणजे कानावर पडणारे कोणतेही शब्द आपण चार वेगवेगळ्या पातळीवर तपासताना ऐेकतो. प्रथम त्या शब्दाचा मतितार्थ काय याचा विचार करतो. ती व्यक्ती जे बोलत आहे त्याला आपण सहमत आहोत की नाही, त्याचा विचार करत असते.

दुसरे म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला त्या बोलण्याच्या आसपासचे संदर्भ विचारत आपला त्या बाबतचा समज आणि आयाम वाढवत असतो आणि या समजाच्या आकलनानुसार प्रश्न विचारत असतो. याचबरोबर संवाददात्याला काय सल्ला द्यायचा, त्याच्या प्रश्नांचे साधारणपणे उत्तर काय असू शकेल वा त्याचे शंकासमाधान करता येईल याचाही विचार आपण याच वेळेस करतो. आणि या तिनही बाबींबरोबर हे सारे समोरची व्यक्ती मला का हे सगळं सांगतीय, तीचा हेतू काय असवा याबद्दलही विचार करत असतो. म्हणूनच आपण शब्द ऐकत असलो तरी समोरच्या व्यक्तीला जे काही म्हणायचे आहे ते तसंच्या तसं ऐकत नसतो. सांगणं आणि ऐेकणं यात फरक हा होतोच. त्यामुळे जे सांगितले तसे असे आपण म्हणत असलो तरी ते आपल्याला समजले तसेच असते. आता यावर उपाय काय, तर चित्तावधान एक करून ऐेकणे हाच पर्याय समोर येतो. म्हणूनच आपण ऐेकण्याचा सराव हा करायलाच हवा.

Life Skills : There are four stages of thinking while listening

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी