लाईफ स्किल्स : शरीरात चरबी वाढू देवूच नका, अन्नाच्या ताटालाही लागू करा मिनिमलीझमचे तत्व


सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. श्रावण महिन्याच्या धामधुमीनंतर आता दसरा येईल व नंतर दिवाळी. या काळात खाण्यापिण्याची चंगळ असते जणू. प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ त्याच्या जोडील खमंग पदार्थांची रेलचेल असते. जोडीला मिढाईदेकील असते. अर्थात अशावेळी चार घास जादा खाण्यास हरकत नाही. मात्र सध्याच्या काळात तुम्ही आजूबाजूला पाहिल्यास हाटेलात जावा किंवा कोणत्या कार्यक्रमात. तेथे जेवणसाठी अनेक पदार्थ असतात. बुफे पद्धत असली तरी लोक आपल्या प्लेटमध्ये अनेक पदार्थ वाढून घेतात. त्यातील थोडे तरी अन्न प्रत्येक जण टाकून देतो. खरे पाहिल्यास या अन्नाच्या ताटालाही मिनिमलीझमचे तत्व लागू करण्यास खरे तर काहीच हरकत नसते. Life Skills: Don’t let fat build up in your body, apply the principle of minimalism to your diet.

जगात मिनीमलीझमच्या वेगाने प्रसार व्हावा यासाठी झटणारा लिओ बबुता सांगतो मिलीमनीझम हा केवळ वस्तूंपुरताच लागू नाही. जीवनाच्या साऱ्या अंगाला तो स्पर्श करतो. केवळ अडगळ कमी करणे, कमी वस्तु विकत घेणे यावर तो थांबत नाही. तो सांगतो मिनिमलीझम अगदी आपल्या रोजच्या जेवणाला किंवा स्वयंपाकघरातही लागू होते. आपल्या घरात आपण अनेक पदार्थ करीत असतो. त्यावेळी नको असणारे अन्न वगळा ताटात घेवू नका. जेवणाच्या टेबलावर, आपल्या प्लेटमधे इतक्या भरमसाठ गोष्टी कशाला, खाद्यपदार्थांचे निवड करायलाही कठीण इतके वैविध्य, इतका मोठा पोर्शन साईझ गरजेचा आहे का याचा प्रत्येक वेळी विचार करा. शरिराला गरज नसणारे अन्न ताटातून कमी करा. रोजचे अन्न पौष्टीक, ताजे, मोजके आणि पोटभरीचे असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा प्रथम विचार करा. याचा फायदा दोन्ही बाजूने होते. ते म्हणजे अन्नाची नासाडी तर थांबतेच. त्या शिवाय पोटात आवश्यक तेवढे अन्न गेल्याने चरबी वाढण्याचा धोका टळतो.

Life Skills: Don’t let fat build up in your body, apply the principle of minimalism to your diet.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात