विज्ञानाची गुपिते : शरीरात ड जीवनसत्व कसे बनते


मानवी शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. How Vitamin D is made in the body

आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे. हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ड जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी. सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील ब किंवा अल्ट्राव्हायोलेट प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात.

सूर्य उगवताना तांबूस दिसतो कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात.

मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ब किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ड जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ड जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं.

सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्याआही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ड जीवनसत्त्व बनवू शकतं. २५ ते ३० मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर. आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला विकसित झाल्याचे मानले जाते. ती कल्पना लवकरात लवकर दूर केली पाहिजे. कारण न वापरल्यानं माणसाची शेपूट गेली. तसेच न वापरल्यानं शरीराची ड जीवनसत्त्व निर्माण करणारी यंत्रणा संपायला नको.

How Vitamin D is made in the body

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण