विज्ञानाची गुपिते : सौरचुलीचे काम कसे चालते


प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. घरगुती वापरातील एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे सौरचूल. सौरचूल हे एक असे उपकरण आहे ज्यामध्ये पदार्थ शिजविण्याकरिता किंवा उकळविण्याकरिता थेट सूर्यकिरणांमध्ये असलेल्या उष्णतेचा उपयोग केला जातो.How the solar cooker works

सौरचूलीचे पेटीसदृश सौरचूल व अन्वस्तीय सौरचूल असे दोन प्रकार पडतात. अन्वस्तीय सौरचुलीमध्ये सूर्यकिरणे परावर्तकाद्वारे परावर्तित होऊन एका बिंदूपाशी केंद्रीत होतात. सौरचुलीतील अन्वस्तीय तबकडी लोखंडाच्या गजापासून किंवा पातळ पत्र्यापासून बनविलेली असते.

परावर्तक पदार्थ हा त्यावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित करतो. ज्या पदार्थांची परावर्तनशीलता जास्त असते असे पदार्थ परावर्तक म्हणून वापरण्यात येतात. उदा., आरशाचे तुकडे, चकचकीत ॲल्युमिनिअमचा पत्रा इ. परावर्तक पदार्थ अन्वस्तीय तबकडीच्या आतील बाजूला चिकटवतात. अन्वस्तीय तबकडीच्या मध्यभागी अन्न शिजवण्यासाठीचे भांडे ठेवण्याची व्यवस्था असते. गच्चीत, मोकळ्या जागी किंवा सावली नसलेल्या ठिकाणी सौरचूल ठेवण्यात येते.

सौरचुलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवतात. सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळतो. त्यामुळे दिवसभरात साधारण दर वीस मिनीटांनी सूर्यकिरणे आपले स्थान थोड्या अंशाने बदलत असतात. त्यामुळे सौर चुलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवण्यासाठी तीनही अक्षात तबकडी फिरविता येईल अशा रीतीने तबकडी ठेवण्यासाठीची मांडणी केलेली असते.

अशा रचनेमुळे परावर्तकावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित होऊन केंद्रीय बिंदूवर एकत्रित होतात. सूर्यकिरणांच्यात असलेली उष्णता केंद्रीभूत बिंदूपाशी एकवटली जाते आणि ह्या बिंदूपाशीचे तापमान वाढते. केंद्रीय बिंदूपाशी अधिकतम तापमान ३५०० सेल्सिअस पर्यंत मिळू शकते. सौरचुलीचा वापर केवळ वरण, भात, बटाटे, बीट वगैरे शिजवण्यासाठीच होतो असे नाही तर ह्या सौरचुलीत रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात. दूध आटवून बासुंदीही बनवता येते. गैरशाकाहारी पदार्थ शिजविण्याकरिताही याचा उपयोग होतो. सौरचूल वापरल्याने खर्चात बचत होते. तसेच पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास साहाय्य होते.

How the solar cooker works

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण