महावादन बातमी : गोदातीर दुमदुमला रणवाद्यांच्या गजरात; ढोल ताशांच्या महावादनाने निनादला गोदाघाट


  • एकच लय.. एकच हुंकार.. ढोल पथकांचा, महावादनाने दुमदुमला तीर गोदामातेचा

विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी भव्य दिव्य महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे महावादन भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वनवासी वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित करण्यात आला. Godatir dumdumla warriors alarm

एकूणच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समिती तर्फे शनिवार, दि. १६ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वा पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी, नाशिक येथे “महावादन” हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल १००० युवाशक्तींनी सामूहिक ढोल ताशा वादन सादर केले.
यावेळी जेष्ठ ताशावादक श्री राजनजी घाणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,

आमदार राहुल ढिकले, डी. जे. हंसवानी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे मंचावर उपस्थित होते. सन २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे.यावर्षी या महावादनाचं हे ६ वे वर्ष असून आजमितीस तब्बल जिल्ह्यातील ४२ ढोल पथकांशी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या महावादनामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम , बंधुभाव आणि एकोपा हि भावना निर्माण व्हावी या उद्देशाने यावर्षी सर्वांचा एकत्रित मिळून एकच “सुवर्ण कलश मंडित” भगवा ध्वज नाचवण्यात आला.

एकूणच या महावादनात १००० ढोल , २५० ताशे आणि १५०० वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात १५० स्वयंसेवकांनी काम केले आहे. या वर्षी श्रीराम नगरी ढोल ताशा पथकाचे प्रमुख आशिष सोनावणे हे या महावादनाचे प्रमुख होते.

ध्वजप्रणाम करत भारत माता कि जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरवात झाली त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांची गारद देण्यात आली, त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या सर्व पथकांची मिळून शिवस्तुती बसवण्यात आली होती त्याचे देखील यावेळी वादन व सादरीकरण करण्यात आले. मग नाशिक ढोल व पुणे ढोल या तालांचे सादरीकरण करण्यात आले.

तब्बल दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मध्यमा गुर्जर यांनी केले.
यावेळी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, योगेश गर्गे, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

Godatir dumdumla warriors alarm

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात