नाशिक : महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीत बडे मंत्री आमदार आणि आता महापालिकांच्या पदाधिकार्यांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या कारवाया सुरू आहेत. या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तोफांचा भडीमार करत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपमुख्यमंत्री अजित पवार ते जयंत पाटील ते रोहित पवार हे सर्वजण केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर अक्षरश: तुटून पडले आहेत. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे, असे राजकीय परसेप्शन हे सर्व नेते महाराष्ट्रात तयार करत आहेत. ED – IT raids: ED – IT operations; Shiv Sena – guns of NCP leaders; But why Modi-Shah do not give “verbal” reply … ??
तरी देखील एक राजकीय रहस्य उलगडत नाही… ते म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांच्या रोज तोफा धडाडत असताना ज्यांच्यावर हे टीकास्त्र सोडले जात आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला “तोंडी” प्रत्युत्तर का देत नाहीत…??
भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांना महाराष्ट्रात “मुक्तपणे” शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर “सोडले” आहे. ते देखील रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक अनिल परब यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले आहेत. ते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तोंड उघडायला सांगत आहेत. म्हणजे त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मागणी करत आहे. तरी देखील उद्धव ठाकरे अजिबात स्वतःहून पुढे येऊन उत्तरे देत नाहीत. किरीट सोमय्या यांच्यासारख्या माजी खासदार आला स्वतःहून उत्तर देणे म्हणजे किरीट सोमय्या यांच्या आरोपांचे महत्त्व वाढवणे आहे असे उद्धव ठाकरे मानत असतील तर त्यात गैर काही नाही. पण त्यामुळे मूळ प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
तसेच संजय राऊत हे मोदी – शहांचे नाव घेऊन रोज सामनाच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्रातले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर यांना ठोकून काढत आहेत. पण यापैकी फक्त देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील हे दोघेच संजय राऊतांवर किरकोळ टीका करून लगेच ईडीच्या कारवायांच्या मुद्द्यांवर बोलतात.
सक्तवसुली संचालनालय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत 2024 नंतर बघून घेऊ, अशा धमक्या देत आहेत. पण ते अधिकारी संजय राऊत यांना उत्तर देण्याच्या फंदात पडत नाहीत किंवा ही दोन डिपार्टमेंट देखील संजय राऊत यांच्या टीकेची दखल घेताना दिसत नाहीत. कोणतीही सरकारी यंत्रणा या पद्धतीच्या राजकीय टीकेला क्वचितच उत्तर देताना आढळते.
पण हे सर्व असताना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मात्र अजिबात महाराष्ट्रातल्या राजकीय घमासानवर गेले कित्येक दिवस बोललेले नाहीत. उत्तर प्रदेशातील प्रचारात मात्र हे दोन्ही नेते सातत्याने परिवारवादी पक्षांवर घणाघात करताना दिसतात. काँग्रेसने देशात घराणेशाही सुरू केली त्याचे अनुकरण प्रादेशिक पक्षांनी केले आणि भारतीय लोकशाहीला वाळवी लावली, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालचा अमेठीतून सोडले होते. महाराष्ट्रातल्या घमासानवर हे त्यांचे उत्तर आहे का…?? सत्य मानण्यास वाव आहे. किंबहुना हेच ते खरे उत्तर आहे…!!
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभांमध्ये मोदी परिवारवादी पक्षांवर हल्लाबोल करत आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणा प्रत्यक्ष कृतीतून महाराष्ट्रातील परिवारवादी पक्षांवर कारवाई करताना दिसत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी मोदींनी गांधी परिवाराचे नाव न घेता ते बेलवर बाहेर आहेत. एन्जॉय कर ले!!, असे म्हणाले होते. आता प्रादेशिक परिवारवादी पक्षांवर प्रत्यक्ष कारवाया सुरू करून मोदी कृतीतून उत्तर देत आहेत का…?? सत्य मानण्यास वाव आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App