जीवनात नकारात्मकतेला थाराच नको

सकारात्मक विचारांचे महत्व आपण सर्वजण जाणतो. पण तरीही त्या पद्धतीने वागणं मात्र अनेकांना जमत नाही. कारण मनातील विचारांचा नेमका स्रोत वा मूळ काय आहे हेच आपल्याला ठाऊक नसते. आपण फक्त दिवस जसा समोर येतो तसा तो घेतो. मनाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करायला लावणं हे आपल्याला माहीतच नसतं. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नसतात. वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं, चित्रपट, संगीत, आपला मित्र परिवार-नातेवाइकांशी संवाद या सर्व गोष्टींपासून आपल्या मनात अनेक विचार निर्माण होतात. त्यातूनच आपल्या भोवतीचं जग तयार होतं. बऱ्याच जणांना सकाळी वर्तमानपत्र वाचण्याची, दूरचित्रवाणीवरील, आकाशवाणीवरील बातम्यांतून जगभरातील विविध घडामोडी ऐकण्याची सवय असते. Don’t let negativity get in the way of life

जेव्हा आपली झोप पूर्ण होते तेव्हा बाह्य़ मन एकदम शांत असतं व सुप्त मन अधिक सक्रिय असतं. एखाद्या टिपकागदाप्रमाणे ते सगळ्या सकारात्मक किंवा नकारात्मक सूचना आत सामावून घेत असतं. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की सकाळी उठल्यावर दोन तासांपर्यंत आपली ग्रहणशक्ती तीव्र असते. त्यानंतर मात्र ती क्षमता कमी होत जाते. सकाळच्या अशा या महत्त्वपूर्ण वेळात काय घडायला हवं हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. संपूर्ण यशासाठी तसेच दिवसभराच्या आपल्या मानसिक व शारीरिक प्रवासासाठी ज्या सकारात्मक सूचना आवश्यक आहेत त्या सुप्त मनात निर्माण करणं गरजेचं असतं. त्यासाठी काही क्षण अंतर्मुख होऊन स्वत:शीच बसायला हवं.

पण नेमकं या महत्त्वाच्या वेळेत काय घडतं सकाळच्या घरातल्या कामाचा ताण किंवा दूरचित्रवाणीवरच्या सकाळच्या बातम्यांतून अपघात, खून, हिंसाचार दहशतवाद अशा नकारात्मकता वाढवणाऱ्या सूचनांचा स्वीकार नेमका या वेळी या सुप्त मनात होतो. सकाळी सकाळी वाचलेलं-ऐकलेलं संपूर्ण दिवसभर डोक्यात राहतं. म्हणूनच परिस्थिती कुठलीही येवो, प्रथम नकारात्मक विचारच मनात येणार नाहीत याची काळजी घ्याला हवी. वर्तमानपत्रे वाचाण्याची किंवा टी. व्ही पाहण्याची सवयच असेल तर त्यातील सकारात्मक बातम्या, लेख वाचावेत. जेणेकरुन सकाळच्या वेळीच सकारात्मक विचार मनात येतील. यशासाठी हे सारे फार गरजेचे आहे.

Don’t let negativity get in the way of life