विज्ञानाची डेस्टीनेशन्स : मानवाप्रमाणेच संगणक वापरणार तर्क, संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे प्रयत्न सुरू


सध्याचे युग संगणकाचे आहे. माणूस आपले प्रत्येक काम संगणकावर बिनदिक्कतपणे सोपवत आहे. त्यामुळे त्याचा वेळही वाचत आहे व कामातही अचूकता येत आहे. यामुळे खूप कमी वेळात अधिकाधिक काम होते. अशा या संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संगणकाला माणसाची भाषा शिकवण्याचे नवे तंत्रज्ञान तयार झाले आहे. त्यामुळे संगणकही लवकरच माणसाची भाषा शिकू शकेल अशी आशा आहे. संगणकात अनेक भाषा अस्तित्वात आहेत. मात्र संगणकाला भाषा शिकवण्यासाठी भाषातज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ गेल्या ५० वर्षापासून अथक परिश्रम करीत आहेत. यासाठी आवश्यक ते साफ्टवेअर तयार केले जात आहे. याचा प्रयोग सध्या टेक्सास विद्यापीठात सुरू आहे. Destinations of Science: Logic to use computers just like humans, Efforts underway to make computers more intelligent

तेथील संशोधकांनी संगणकाने नैसर्गिकरीत्या भाषा शिकावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. माणूस हा भाषा बोलताना तर्काचा वापर करतो. हे संगणकाला शक्य नसल्याने अन्य पर्याय शोधून काढले जात आहेत. एका शब्दाचे अनेक अर्थ होत असतात. त्यामुळे संगणकाला त्याची मानवाप्रमाणे कल्पना करायला शिकवणे मोठे आव्हान आहे. या संगणकात जगभरातील विविध भाषांतील तब्बल १०० दशलक्ष शब्दांचे संकलन करण्यात आलेले आहे. यासाठी संशोधकांनी हाडूप नावाचे साफ्टवेअर तयार केले आहे. याचा वापर करून शाब्दिक विश्लेषण करता येते असे संशोधकांनी सांगितले. या प्रयत्नांना सध् यश मिळत अशून काही काळातच स्मार्ट संगणक स्वतः भाषा ओळखतील अशी संशोधकांना खात्री आहे. सध्याप्रमाणेच यापुढेही माणूस हा संगणकावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहे. अशा वेळी या संगणकाला मानवी चेहरा दणे ही काळाची गरज राहणार आहे. त्यासाठी हे जे काही संशोधन सुरु आहे त्याचा मानवाला नक्कीच फायदा होणार आहे यात शंका नाही. कारण एकदा का जर संगणक मानवी भाषा जाणू लागला तर जगभरातील डीजीटल डिव्हाइड कमी होण्यासाठी त्याचा मठा फायदा होणार आहे.

Destinations of Science: Logic to use computers just like humans, Efforts underway to make computers more intelligent

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात