चीनचा सगळ्या जगावर “सांस्कृतिक क्रांतीचा सुलतानढवा”…!!


चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी कालच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भाषण केले. काय आहे, त्यांच्या भाषणातला मनसूबा आणि त्याचा between the lines अर्थ, जगासाठी सांस्कृतिक धोक्याची घंटा चीनमधून कशी वाजते आहे, हे समजून घेणे भविष्यातल्या जागतिक व्यूहरचनेसाठी महत्त्वाचे आहे.Chinese leadership trying impose its cultural hegemony over the whole world


चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी काल चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) बैठकीत धोरणात्मक भाषण केले. ते चीनवर दूरगामी परिणामकारक ठरणारे तर आहेच, पण सगळ्या जगाच्या दृष्टीने उघडपणे धोक्याची घंटा वाजविणारे ठरते आहे. अर्थात ही धोक्याची घंटा ज्यांचे कान शाबूत आहेत आणि ज्यांची त्या कानांनी ऐकण्याची इच्छा आहे, त्यांनाच ऐकू येईल.

जिंगपिंग यांच्या भाषणातली भाषा गोड गुलाबी आणि सगळ्या जगाला भूलविणारी आहेच. कारण त्यात “संस्कृती”, “सौम्य”, “संदेश”, “प्रेमळ”, “संज्ञापन”, “सभ्यता”, “जागतिक व्यवस्था”, “सुरक्षा”, “पर्यावरण”, “संस्कृतीचा आवाज” “जनतेचा जनतेशी संपर्क”, वगैरे आकर्षक शब्दांची रेलचेल आहे. विशेषतः भारतीय शांतताप्रिय मनाला तर ते अतिशय भूरळ घालणारे शब्दप्रयोग आहेत. त्या शब्दांचे अर्थ खरोखरच सकारात्मक आणि जगाला भूरळ पाडणारे आहेत…… पण त्या शब्दांच्या मागचे अर्थ किंबहुना जिंगपिंग यांच्या सगळ्या भाषणात दडलेला between the lines अर्थ मात्र, जगाला भयभीत करणारा आणि चीन जगावर सर्वंकष राज्य करू इच्छितो, असे ठळकपणे सूचित करणारा आहे, असे आपण त्याच्या स्क्रिप्टवरून ठामपणे म्हणू शकतो. जिंगपिंग यांच्या भाषणातला काही भाग एएनआय वृत्तसंस्थेने इंग्रजीत दिला आहे. तो वाचून तर या निष्कर्षाला अधिक बळकटी येते.

जिंगपिंग यांच्या अख्ख्या भाषणात कोरोना विषाणूचा उगम वुहानच्या लॅबमध्ये असल्याचा पूसटसा उल्लेखही नाही. किंबहुना तो तसा असणेही अपेक्षित नाही. पण ज्या विषाणूने सगळ्या जगात थैमान घातले. दुसऱ्या महायुध्दाच्या ५ वर्षांच्या काळात जेवढी माणसे मेली, त्यापेक्षा अधिक माणसे गेल्या वर्षभरात कोरोनाने दगावली… त्याबद्दल जिंगपिंग यांच्या भाषणात संवेदना दाखविण्याचे सौजन्यही दिसत नाही. उलट जे झाले ते झाले.

त्यामध्ये चीनची प्रतिमा जी जगात मलिन झाली आहे, ती उजळण्यासाठी पुढची पावले कशी टाकायची, त्याचे पुरेपूर मार्गदर्शन जिंगपिंग यांच्या भाषणातून दिसते.

चीनला आता सांस्कृतिकदृष्ट्या जगावर राज्य करायचे आहे. संपूर्ण जगाचे उत्पादन केंद्र चीनला बनवून झाले आहे. जगातील सगळ्या खंडांमधील छोट्या आणि मध्यम देशांना चीनच्या कर्जाच्या विळख्यात पुरते अडकवून झाले आहे.

भारतासारख्या देशांना लष्करीदृष्ट्या धमकावणे चालू आहे. आता चीनचा पुढचा मनसूबा जिंगपिंग यांच्या भाषणातून पुढे आला आहे, तो म्हणजे चीनची संस्कृती सगळ्या जगाला त्यांना समजावून सांगायची आहे. संस्कृती या “व्यापक” (Comprehensive) संकल्पनेत जे काही येते ते सर्व “सर्वंकष”(totalitarian)चिनी स्वरूपात मांडण्याचा आणि जगात अमलात आणण्याचा हा घातक मनसूबा आहे. संस्कृतीच्या सर्व संकल्पनांचा चिनी अर्थ जगाला प्रस्थापित करून दाखवायचा आहे. यासाठी जगातली संज्ञापनेची सगळी हत्यारे वापरण्याची चीनची तयारी आहे. हेच जिंगपिंग यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले आहे.

यासाठी जिंगपिंग यांनी, “विकासाची”, “सभ्यतेची”, “सुरक्षेची”, “मानवाधिकाराची”, “पर्यावरणाची”, “आंतरराष्ट्रीय राजकीय उतरंडीची” आणि “जागतिक कारभार व्यवस्थेची” चिनी संकल्पना आणि व्याख्या सगळ्या जगाने अमलात आणण्यासाठी आपण आग्रही राहिलो पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे.

आज जगाला चीनच्या सांस्कृतिक क्रांतीची ओळख करून देण्याची गरज आहे. सगळ्या जगात “चीनच्या संस्कृतीचा आवाज” पोहोचविण्याची आपली जबाबदारी आहे. ही संस्कृती जगाला समजावून सांगण्याची, शिकविण्याची आणि जगात अधिक चांगल्या पध्दतीने ठसविण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे.

चीनची एक विश्वासार्ह, प्रेमळ आणि आदरणीय देश असल्याची प्रतिमा सगळ्या जगासमोर उभी करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे जिंगपिंग यांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे.

यासाठी चीनची राजनैतिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान या सगळ्या घटकांची ताकद चीनच्या सर्व क्षेत्रातील तज्ञांना उपलब्ध करवून देण्याचा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. जनतेचा जनतेशी संपर्क हे अभियान दीर्घकालीन योजनेचा एक भाग आहे. चीनची राजकीय व्यवस्था जागतिक मीडियाला त्या देशातल्या सत्य माहितीपासून वंचित ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

पण आता चिनी नेतृत्वाला ते देखील पुरेसे वाटत नाही. यासाठी जागतिक मीडियावर चीनमध्ये लादलेली बंधने कायम ठेवून चीनच्या नव्या मीडियाची व्यापकता आणि पोहोच वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. याचाही कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

हा एक प्रकारचा चीनचा संपूर्ण जगावर “सांस्कृतिक सुलतानढवा” आहे, असे मानण्यास वाव आहे. कारण सुलतानढवा या लढाईच्या पध्दतीत शत्रूवर सगळ्या बाजूंनी सर्व ताकदीनिशी एकदम हल्ला करणे हे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. चीनचे सर्वोच्च नेतृत्व नेमके आज तेच करू पाहातेय. क्षी जिंगपिंग यांच्या भाषणातले between the lines तरी नेमके हेच सांगते आहे.

Chinese leadership trying impose its cultural hegemony over the whole world

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था