केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज विविध वृत्तवाहिन्या चर्चेचे रतीब घालतात. त्यावर विश्लेषण करतात. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेगळाच पायंडा पडत केंद्रीय अर्थसंकल्पाचा अर्थ सांगण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. Budget speech: Narendra Modi’s footsteps on the steps of Nani Palkhiwala !!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 1 फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे नेमके इंगित काय आहे?, हा अर्थसंकल्प प्रक्रिया सुधारणावादी कसा आहे?, याचे तपशीलवार विवेचन पंतप्रधान मोदींनी केले आहे. आकडेवारीच्या जंजाळात न अडकता सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात या अर्थसंकल्पाचा कसा उपयोग आणि फायदा होईल, याचे सूत्रबद्ध विवेचन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकल्यानंतर यासंदर्भातली एक जुनी आठवण ताजी झाली. प्रख्यात कायदेतज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ नानी पालखीवाला यांनी अशाप्रकारे अर्थसंकल्पाच्या विवेचनाची सुरुवात केली होती. याची ही आठवण आहे. त्यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पावर दोनच भाषणे होत असत. पहिले भाषण अर्थातच केंद्रीय अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण असे आणि दुसरे नानी पालखीवाला यांचे मुंबईत बजेट भाषण असे. त्याची सुरुवात नानी पालखीवाला यांनी 1958 च्या बजेट भाषणाने केली. त्यावेळी मुंबईच्या ग्रीन हॉटेलमध्ये उद्योगपतींच्या एका बैठकीत नानी पालखीवाला यांचे बजेट भाषण झाले होते. नानी पालखीवाला उत्तम वक्ते होते. त्यामुळे अर्थसंकल्पासारखा किचकट विषय त्यांनी सोप्या पद्धतीने आणि सर्वसामान्यांना समजेल अशा इंग्रजी भाषेत सांगितला.
निर्मला सीतारामन यांच्या परखड प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने चिदंबरम यांना उतरवले बजेटच्या मैदानात!!
नानी पालखीवाला यांच्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे त्यांच्या बजेट भाषणाची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांच्या बजेट भाषणासाठी नंतर ब्रेबॉर्न स्टेडियम बुक करावे लागायचे. हे बजेट भाषण ऐकण्यासाठी 20 -25 हजार लोक जमायचे. नानी पालखीवाला यांच्या सोप्या इंग्रजीत ते बजेट समजावून घ्यायचे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बजेट भाषण याच स्वरूपाचे झाले. त्याचे निमित्त जरी भाजप कार्यकर्त्यांना बजेट समजावणे असले तरी मोदींनी संबोधन आपले सर्व विषय हे सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत विशद करून सांगितले. अर्थसंकल्पातील आकडेवारीच्या जंजाळात अडकले नाहीत, तर शेतीपासून संरक्षण क्षेत्रांपर्यंत देशाच्या परिस्थितीमध्ये कसे अमुलाग्र बदल होत आहेत?, सीमावर्ती आणि पर्वतमय प्रदेशात कोणते बदल होणे अपेक्षित आहे?, त्यासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले आहे.
एक प्रकारे सर्वसामान्यांना सोप्या भाषेत बजेट समजावून सांगण्याचा प्रकार आहे आणि याची सुरुवात नानी पालखीवाला यांनी केली होती. पंतप्रधान मोदी एक प्रकारे त्यांचीच परंपरा यंदापासून पुढे नेण्याचा विचारात दिसत आहेत. नानी पालखीवाला यांच्या भाषणाच्या वेळी वृत्तवाहिन्या नव्हत्या. बजेटवरच्या चर्चा दुर्मिळ होत्या. वृत्तवाहिन्यांमध्ये शिरलेले स्वयंघोषित तज्ञ नव्हते. त्यामुळे विश्लेषणाची ही भरमार नव्हती. पण आज वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे. त्यामुळे तज्ञांच्या विश्लेषणाचीही भरमार आहे. तरीही सर्वसामान्यांना बजेट समजेलच याची खात्री नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नानी पालखीवाला यांची बजेट भाषणाची परंपरा एक प्रकारे पुनरुज्जीवित केल्याचे दिसत आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App