मेंदूचा शोध व बोध : मानसशास्त्रज्ञांच्या मते घोकंपट्टी करणे चुकीचेच, मग नेमकी स्मरणशक्ती वाढवायची तरी कशी?


आपण स्वतःला कितीही हुशार मानलं तरीही बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या बुद्धीचा योग्य तऱ्हेने वापर करू शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या याची योग्य पद्धत माहीत नसते. योग्य प्रकारे स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मग चुकीचे उपाय केले जातात. याचा परिणाम अस होते की आपल्या मनातला गोंधळ वाढतो नेमकी स्मरणशक्ती वाढवायची तर कशी? नवे शब्द किंवा भाषा शिकताना सहसा ते लक्षात ठेवण्यासाठी पाठ करण्यावर भर दिला जातो. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते घोकंपट्टी करणं चुकीचं आहे. कारण तसं केलं तरी आपल्या मेंदूच्या लक्षात या गोष्टी राहतीलच असं नाही. Brain Discovery and Enlightenment: According to psychologists, it is wrong to gossip, so how to improve memory?

एखादा विषय किंवा मुद्दा लक्षात ठेवायचा असला तर त्याचा अभ्यास थोड्या थोड्या वेळाने करावा. त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहील. एखाद्या पुस्तकातला एक धडा वाचावा मग दुसरं काहीतरी वाचायचं. काही काळाने आधी जो धडा वाचला आहे तो परत वाचावा. तो धडा परत एका तासाने वाचू शकता, एका दिवसाने किंवा एका आठवड्यानेही. अभ्यास झाल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की, वाचलेल्यापैकी किती कळलं. त्याने मेंदूला या विषयाची चांगली ओळख होईल. वाचताना जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते अधोरेखित करण्यास काही हरकत नाही. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत दरवेळेस यशस्वी होईलच असं नाही.

अनेक विद्यार्थी तर पूर्णच्या पूर्ण परिच्छेद अधोरेखित करतात. असं केलं तर महत्त्वाचे मुद्दे आणि बिनमहत्त्वाचे मुद्दे यांच्यात फरक करणं कठीण होऊन बसतं. मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की आधी कोणत्याही विषयाचं पुस्तक पूर्ण वाचा. मग त्यातले मुद्दे अधोरेखित करा. संपूर्ण वाचल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केल्याने त्या विषयाचा शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. प्रत्येक वाक्य अधोरेखित करत बसायची गरज नाही.

Brain Discovery and Enlightenment: According to psychologists, it is wrong to gossip, so how to improve memory?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात