स्थापना 6 एप्रिल 1980… अवघी 42 वर्षे…!! 1984 लोकसभेत फक्त 2 खासदार निवडून येण्यापासून सुरुवात… ते आज संपूर्ण जगातला मोठा राजकीय पक्ष… हा भारतीय जनता पार्टीचा प्रवास आहे…!! BJP Growth: 42 years – 900% electorate – MP 15000% increase !!; Overcome the Chinese Communist Party too !!
काही हजार कार्यकर्त्यांनी सुरू झालेला हा प्रवास कोणत्याही परिवार वाद न पाळता कोट्यावधी कार्यकर्त्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. मूलस्थानी राष्ट्रवाद आणि अंत्योदय हा मंत्र घेऊन भाजपची स्थापना झाली. त्यावेळी लोकप्रतिनिधीत्व दुर्मिळ आणि तुरळक होते. पण आज पंचायती पासून पार्लमेंट पर्यंत सगळीकडे भाजपचा जो दबदबा निर्माण झाला आहे त्यामध्ये मूलस्थानी राष्ट्रवाद आणि करोडो समर्पित कार्यकर्ते या द्विसूत्राने काम केले आहे.
भाजपच्या राजकीय वाटचालीत 42 वर्षांमध्ये आमदारांमध्ये 900%, मतदारांमध्ये 1000 % और खासदारांमध्ये 15000 % वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीपासून पार्लमेंट पर्यंत सगळीकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जनसेवेत गुंफून घेतले आहे.
मुझे गर्व है, कि मैं उस पार्टी की कार्यकर्ता हूं, जिसके केवल 42 सालों में विधायक 900%,वोटर्स 1000 % और सांसद 15000% से बढे है! पंचायत से पार्लिमेंट तक वर्चस्व रखने वाली विश्व का सबसे बडा राजनैतिक दल बना मेरे भाजपा को, लाखों कार्यकर्ताओं को 42वे स्थापना दिन की हार्दिक शुभकामनाये. pic.twitter.com/ffQLl6K2ZZ — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) April 6, 2022
मुझे गर्व है, कि मैं उस पार्टी की कार्यकर्ता हूं, जिसके केवल 42 सालों में विधायक 900%,वोटर्स 1000 % और सांसद 15000% से बढे है!
पंचायत से पार्लिमेंट तक वर्चस्व रखने वाली विश्व का सबसे बडा राजनैतिक दल बना मेरे भाजपा को, लाखों कार्यकर्ताओं को 42वे स्थापना दिन की हार्दिक शुभकामनाये. pic.twitter.com/ffQLl6K2ZZ
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) April 6, 2022
एवढेच काय पण भारत आणि चीन या दोन देशांच्या राजकीय पक्षांची तुलना केली, तर ज्या चिनी सर्वंकष कम्युनिस्ट राजवटीत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व अनिवार्य असताना भारतासारख्या लोकशाही देशातल्या भारतीय जनता पार्टीचे वैचारिक आणि सामाजिक मूल्यांकन आणि वाढ ही आकडेवारीत चिनी कम्युनिस्ट पक्षाला ओलांडून गेली आहे.
1980 मध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाची सदस्यसंख्या 3 कोटी होती. त्यावेळी भाजपचे सदस्य संख्या अवघी 25 लाख होती. 2019 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची समिती सदस्य संख्या 9 कोटी तर भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या तब्बल 17 कोटी आहे.
या सर्व आकडेवारीचे वैशिष्ट्य म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची वाढ ही एकपक्षीय आणि बंधनात्मक राजवटीत होत आहे तर भारतामध्ये बहुपक्षीय आणि लोकशाही राजवट आहे. त्यामुळे भारतातल्या खुल्या वातावरणात कोणत्याही राजकीय पक्षाला सदस्य संख्या वाढवण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण आहे. तेवढे स्पर्धात्मक वातावरण चिनी कम्युनिस्ट पक्षाला आपल्या राजकीय इतिहासात कधीही अनुभवावे लागलेले नाही. तरी देखील चिनी कम्युनिस्ट पक्षाची सदस्यसंख्या चीनच्या अवाढव्य लोकसंख्येच्या तुलनेत एक प्रकारे “मर्यादित”च राहिली. किंबहुना नगण्यच राहिली तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या प्रचंड वाढत जाऊन 2022 मधील 20 कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
भाजपच्या या राजकीय वाटचालीत अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हा मूलाधार राहिला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे वैचारिक भरणपोषण राजकीय हिंदुत्वावर आधारित आहे. परंतु सदस्य संख्येच्या बाबतीत सुरुवातीला अगदी जवळपास असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष नंतर मात्र सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रचंड तफावत असणाऱ्या दोन स्वतंत्र संघटना झाल्याचे दिसते. 1980 मध्ये संघाची सदस्यसंख्या 20 लाख तर भाजपची सदस्यसंख्या 25 लाख होती पण 2019 मध्ये संघाची सदस्य संख्या 59 लाख तर भाजपची सदस्य संख्या 17 कोटी एवढी आहे. ही आकडेवारी बरीच बोलकी आहे. देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरचे भाष्य करणारी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App