जनक… आरक्षणाचे, सहकाराचे, शिक्षण क्रांतीचे अन् समाज परिवर्तनाचे!

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी त्यांच्या कार्यचे विवेचन  करून त्यांना केलेला हा त्रिवार मुजरा!

योगेश केदार, कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व या भारतभूमीवर जन्माला आले. शिवछत्रपतींनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन भूमिपुत्रांचे कालातीत स्वराज्य निर्मिले. त्याच राजगादीचे नववे वारसदार असलेल्या शाहू महाराजांनी सुद्धा, शोषित पीडित वंचित बहुजनांना न्याय देऊन समतेचा संदेश दिला आणि मराठेशाहीचा खरा आदर्श प्रस्थापित केला.
आरक्षणाचे जनक, सहकाराचे जनक, अनेक धरणे बांधून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवणारे, अडगळीत पडलेल्या तोफा किर्लोस्कर यांना देऊन त्यापासून शेतीपूरक औजारे बनवून घेणारे शाहू महाराज हे खरे आद्य हरितक्रांतीचे जनक म्हणावे लागतील. अनेक बाजारपेठा स्थापून व्यापारी आणि शेतकरी यांची सुविधा उभी करणारे शाहू महाराज. शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे आणि सक्तीचे शिक्षण कायदा बनवणारे आद्य शिक्षण महर्षी शाहू महाराज. एका दलित व्यक्तीला हॉटेल काढायला लावून त्याच्या हातून चहा पिणारे आणि सर्व मंत्रिमंडळाला सक्तीने पाजवणारे आणि त्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करणारे आद्य समाज क्रांतीकारक शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वस्वी मदत करणारे शाहू महाराज.


वैदिक स्कूलची स्थापना करून वेद विद्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खुले करणारे शाहू महाराज. क्षात्र जगद्गगुरू पीठ निर्माण करून एका बलशाली व्यवस्थेला हादरा देणारे शाहू महाराज. आपल्या धर्माला नावे ठेवण्यापेक्षा त्यामध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यासाठी महाराजांनी कष्ट घेतले. महाराजांनी हिंदू धर्मात काल सुसंगत सुधारणेचा जेवढा आग्रह धरला तेवढा क्वचित कुठल्या राजाने धरला असेल. पण म्हणून त्यांनी इथल्या संस्कृतीला पूर्णपणे निकाली काढले असे दिसत नाही. इतर धर्मियांना सुद्धा त्यांच्या आस्था परंपरा जीवित ठेवण्यासाठी महाराजांनी प्रोत्साहित केले. आजही जिवंत सर्व धर्म समभाव जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते कोल्हापुरातच.
महाराजांचे अजूनही अनेक क्षेत्रात अजोड कार्य आहे. आपल्या रयतेला साहित्य, कला, संगीत, क्रीडा, अश्या मानवजातीला समृद्ध करणाऱ्या विविध कार्यक्षेत्रात उत्तुंग उंची गाठून देण्याची किमया साधलेल्या शाहू महाराजांना समजून घेणे, खरोखरच कठीण आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी त्रिवार मुजरा!

Article on Chatrapati Shahu Maharaj on his birth anniversary

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात