अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तिप्पट सोने ; दहा देशामध्ये आहेत सोन्याचे साठे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आज धनत्रयोदशी. भारतीय नागरिक हमखास या दिवशी सोने खरेदी करतात. पण,जगभरातील सोन्याचा विचार केल्यास अमेरिकेच्या सरकारी तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तीनपट म्हणजे तब्बल २५ हजार टन सोने आहे. जगात सोन्याच्या तस्करांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. कोणत्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे, हे जाणून घेऊया. Indian citizens have Triple gold then US treasury ; Ten countries have gold reserves

अमेरिका : ८१३३.५ टन सोन्याच्या साठ्यासह अमेरिका हा देश या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हे सोने अमेरिकेच्या बुलियन डिपॉझिटरीमध्ये जमा करण्यात आले आहे. याचे मॅनेजमेंट ही अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाद्वारे केली जाते.
जर्मनी : या युरोपियन देशात ३३६२.४ टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबत जर्मनी हा देश दुसर्‍या स्थानावर आहे. जर्मनीतील सोन्याचे साठे फ्रॅंकफर्टमधील ड्यूश बुंडेसबँक, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिकेची न्यूयॉर्क शाखा आणि लंडनमधील बँक ऑफ इंग्लंड या ठिकाणी ठेवले आहेत.
इटली : ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या इटलीमध्ये २४५१.८टन सोन्याचा साठा आहे. या साठ्या बहुतांश सोन्याच्या विटांच्या समावेश आहे. याशिवाय यात सोन्याच्या नाण्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सोन्याची देखरेख बँक ऑफ इटली करते.

फ्रान्स : फ्रान्सच्या केंद्रीय बँकेने काही महिन्यांपूर्वी त्यांचे काही सोने विकले होते. यानंतर, फ्रान्सकडे २४३५.७ टन सोन्याचा साठा शिल्लक आहे. फ्रान्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सने नेहमीच संकटाच्या वेळी सोन्याच्या साठ्याचा वापर केला आहे.

रशिया : गेल्या सात वर्षांपासून रशियातील सोन्याचे साठे २२९९.९ टनाच्यावर राहिले आहेत. हा सोन्याचा साठा वाढवण्यासाठी रशियाने वारंवार सोन्याची खरेदी केली आहे. सद्यस्थितीत रशिया हा सोन्याच्या साठ्याच्या बाबत पाचव्या क्रमांकावर आहे.

चीन : २००९ नंतर पहिल्यांदाच पीपल्स बँक ऑफ चायनाने महिना-दर महिन्याच्या आधारे सोने खरेदी करण्याची योजना आखली होती. त्यानुसार सध्या चीनकडे १९४८.३ टन सोन्याचे साठा आहे. चीन हा देश सोनं साठ्याच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.



 

स्वित्झर्लंड : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडकडे १०४०.०टन सोन्याचा साठा आहे. त्यामुळे ते सोन्याच्या साठ्याच्या प्रकरणात सातव्या स्थानावर आहे. दुसर्‍या महायुद्धात स्वित्झर्लंडने तटस्थ भूमिका घेतली होती. त्यानंतर हा देश युरोपतील सुवर्ण व्यापार केंद्र म्हणून उदयास आला.

जपान : आशियातील महासत्ता असलेला देश म्हणून जपानची जगभरात ओळख आहे. त्याच्यांकडे ७६५.२ टन सोन्याचा साठा आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला जपान सोन्याच्या साठ्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
भारतः सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा नववा क्रमांक लागतो. भारताकडे ६५७.७टन सोन्याचा साठा आहे. तर भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याच्या हिस्सा ७.५ टक्के इतका आहे.

नेदरलँड्स: कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलँड्सकडे ६१२.५ टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत तो दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे हा सर्व साठा एम्स्टर्डमपासून कॅप न्यू एम्स्टर्डम या ठिकाणी स्थित केले आहे.

Indian citizens have Triple gold then US treasury ; Ten countries have gold reserves

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात