अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पाहण्यासाठी गुरुवारपासून आर्थर रोड तुरुंगाबाहेर गर्दी झाली होती. पण आर्यन खान बघता बघता किमान दहा जणांचे खिसे कापले गेले. लाइव्ह लॉ इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर ही घटना घडली. मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला मुंबई हायकोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या निर्णयाकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. 10 Mobile phones stolen outside arthur road jail While People Wating For Aryan Khan release Reports
वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पाहण्यासाठी गुरुवारपासून आर्थर रोड तुरुंगाबाहेर गर्दी झाली होती. पण आर्यन खान बघता बघता किमान दहा जणांचे खिसे कापले गेले. लाइव्ह लॉ इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर ही घटना घडली. मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला मुंबई हायकोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या निर्णयाकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.
आर्यन खान शनिवारी सकाळी 11:2 वाजता आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला आणि 11:34 वाजता त्याच्या घरी ‘मन्नत’वर पोहोचला. मात्र उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आर्थर रोड जेल आणि मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी होऊ लागली. आर्यन खान तुरुंगातून कधी बाहेर येईल, अशी उत्सुकता गर्दीत उभ्या असलेल्या चाहत्यांच्या मनात होती. यानिमित्ताने खिसे कापण्याची संधी चोरट्यांनी साधली. जमावात घुसलेल्या काही पाकिटमारांनी किमान 10 जणांचे मोबाईल फोन गायब केले.
#AryanKhan will be released anytime now. Several onlookers have gathered. Nearly 10 phones were stolen from this location yesterday. pic.twitter.com/OLj4wtCFt2 — Live Law (@LiveLawIndia) October 30, 2021
#AryanKhan will be released anytime now. Several onlookers have gathered.
Nearly 10 phones were stolen from this location yesterday. pic.twitter.com/OLj4wtCFt2
— Live Law (@LiveLawIndia) October 30, 2021
शुक्रवारी आर्यन खानला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. आर्यन तुरुंगातून बाहेर आला नाही, काही लोकांना त्रास सहन करावा लागला, तो वेगळाच. काही लोकांनी गर्दीतून बाहेर पडून खिशात हात घातला असता त्यांना त्यांचा मोबाईल गायब असल्याचे दिसून आले. आर्थर रोड कारागृहाबाहेर किमान 10 जणांसोबत अशा घटना घडल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जाला परवानगी दिली होती. शाहरुख खानची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी 23 वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर झाली. उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या आदेशाची प्रत उपलब्ध करून दिली. यामध्ये 14 अटींचा उल्लेख करण्यात आला असून, त्यानंतर आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App