विशेष प्रतिनिधी
मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर क्रूज शिप ड्रग प्रकरणात आर्यन खानच्या बाजुने वकील सतीश माने शिंदे देखील कोर्टामध्ये हजर होते. मनिष शिंदेनी आर्यन खानचा प्रकरणानंतर अतिशय महत्त्वाचे विधान केले आहे.
आर्यन खान याला जामीन मंजूर झाल्याबद्दल सतीश मानेशिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्नदेखील उभे केले आहेत.
Big statement by Satish Maneshinde after Aryan Khan’s bail
मानेशिंदे म्हणतात, एका स्टारच्या मुलाला 25 दिवस त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसताना त्रास सहन करावा लागला. आर्यन खानने तुरुंगात पंचवीस दिवस काढले तर एखाद्या गरीब माणसाची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. दोन कनिष्ठ न्यायालये त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत असे मोठे विधान त्यांनी केलं आहे.
Aryan Khan : हुश्शऽऽऽ…अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर ; ‘मन्नतवर दिवाळी’
कनिष्ठ न्यायालयांच्या अशा अनावस्थेमुळे कायदेशीर व्यवस्थेवर भार पडतो आहे आणि उच्च न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. आर्यन खानच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयांनी गोष्टीचा निकाल करणे आवश्यक होते. पण हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचला आणि त्रिस्तरीय लढा सुरू झाला.
पुढे ते म्हणाले की, आर्यन खान हा भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना एक कायदेशीर टीम त्याच्या केससाठी मिळाली. या देशात हजारो लोकांना वकील परवडत नाहीत. जे अशिक्षित आहेत, गरीब आहेत, उपेक्षित आहेत. आपल्या देशाने आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांचा विचार करून न्यायव्यवस्था सुधारली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App