विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे इलॉन मस्क यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये ते लिहितात, ‘टेक्सास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स नावाची नवीन युनिव्हर्सिटीत सुरू करण्याच्या विचारात मी आहे.’
Elon Musk will launche new university?
त्यांच्या या ट्विटनंतर बऱ्याच लोकांनी रिट्वीट करत याला हास्यास्पद आहे असे मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी शैक्षणिक व्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले होते, कॉलेज फक्त मजा करण्यासाठी असते. तुमच्यात आधीपासून असलेल्या गुणांना तुम्ही स्वतःच पुढे नेण्यासाठी तिथे प्रयत्न करता. काहीही शिकायचे असल्यास तुम्हाला कॉलेजमधून जाऊन शिकण्याची तशी काही जास्त गरज नसते. कारण तुम्हाला जे काही शिकायचं असेल ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कुठेही आणि कसेही शकू शकता.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी रचला इतिहास, एका दिवसात कमावले तब्बल २.७१ लाख कोटी रुपये
पुढे ते असेदेखील म्हणाले होते की, टेस्टला कंपनीमध्ये काम करायचे असल्यास, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मधील डिग्री असणे अजिबात आवश्यक नाही. तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह माइंड असेल तर आम्ही तुम्हाला हायर करू असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटवर मात्र लोकांनी शंका व्यक्त केलेली आहे.
मस्क स्वतः किंग्स्टन, ओंटारियो येथील क्वीन्स विद्यापीठात दोन वर्षे शिकले आहेत. नंतर त्यांची पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी करण्यास सुरुवात केली परंतु दोन दिवसांनी तो बंदही केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App