वृत्तसंस्था
लंडन : कोरोना विषाणूपेक्षा त्याची सुधारित आवृत्ती असलेला डेल्टा विषाणू अधिक घातक आहे. हा डेल्टा विषाणू लस घेतलेल्या लोकांकडून अधिक प्रसारित होण्याचा धोका आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. Corona Virus: People infected with the corona vaccine are also at risk of spreading the Delta virus, according to research in the UK
लस न घेतलेल्या लोकांइतकाच लस घेतलेल्या लोकांकडूनही कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे, असेब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आले आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे.
लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या लसी डेल्टा विषाणूवर कमी परिणामकारक आहेत, असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा संसर्ग घरातील व्यक्तींपासून सर्वांत जास्त प्रमाणात होतो असे दिसून आले आहे. मात्र, लस घेतलेल्या लोकांकडून किती प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होतो यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App