वृत्तसंस्था
मुंबई : एमपीएसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज ( ता.३० ) उद्या ( ता. ३१) लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र विद्यार्थ्याला सोबत ठेवावं लागणार आहे. आज ३० आणि उद्या ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबरला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला दिले होते. याला रेल्वेनं मंजूरी दिली आहे. Students taking the MPAC exam today, tomorrow for local travel
राज्य सरकारने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करणार असून त्यांना ३० व ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.
एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असलेल्या व्यक्तिंना वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी, असं राज्य शासनानं म्हटलं होतं. सरकारच्या या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App