पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.अफगाणिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पूर्ण केले. गाठले.Pakistan’s third consecutive victory; Afghanistan lost by five wickets
विशेष प्रतिनिधी
दुबई : T-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने सलग तिसरा विजय प्राप्त केला. यासह पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला.
अफगाणिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पूर्ण केले. गाठले. त्यामुळे आता पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. दरम्यान या सामन्यात मोहम्मद रिझवान ८ धावांवर बाद झाला.
मात्र, आझम आणि फखर झमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी रचली. तर रशीद खानने मोहम्मद हाफिज आणि आझम यांना माघारी पाठवले. परंतु आसिफ आणि शोएब मलिक यांनी मोठे फटके मारत पाकिस्तानला विजय प्राप्त करून दिला.
दरम्यान अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १४७ अशी धावसंख्या केली. पाच गडी ६४ धावांत गमावल्यानंतर मात्र नजीबुल्ला झादरानने २२ धावा काढत चांगली फलंदाजी केली. आणि कर्णधार नबी नाबाद ३५ आणि गुलबदिन नैब नाबाद ३५ अशी ७१ धावांची भागीदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App