विशेष प्रतिनिधी
मुबंई : क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला काल कोर्टाने बेल मंजूर केली आहे. त्यानंतर बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रेटींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गोष्टींबद्दल आनंद व्यक्त केला. तर अभिनेत्री पूजा भट्टने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे ट्विटर हॅन्डलवरून आभार मानले आहेत.
Bombay Begum star Pooja Bhatt thanked Minority Minister Nawab Malik
या सर्व प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप देखील केले होते. नवाब मलिक मांडलेला सर्वात मोठा मुद्दा होता, मुंबईमधील बॉलीवूड चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. या पाश्र्वभूमीवर बॉम्बे बेगम स्टार पूजा भट्ट हिने नवाब मलिक यांचे आभार मानताना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
NAWAB MALIK : …तर मी राजकारण सोडेन-मंत्रिपद सोडेन ; समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका
पूजा लिहिते, थँक्यू नवाब मलिक. हिंदी चित्रपटसृष्टी विरूध्द जाणीवपूर्वक तयार केलेल्या इंजिनीअर्ड कॅम्पेन विरूद्ध आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद. बॉलीवूड चित्रपट सृष्टी विरूध्द सुरू असलेल्या या द्वेषपूर्ण कॅम्पेनमुळे आम्हाला अनाथपणाची भावना येते. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे आणि बऱ्याच वर्षांपासून मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबई आणि बॉलीवूड हे एकमेकांना जोडलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App