NAWAB MALIK : …तर मी राजकारण सोडेन-मंत्रिपद सोडेन ; समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका


ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे. NAWAB MALIK:… So I will leave politics – I will leave the ministry; Public role of Nawab Malik in Sameer Wankhede case


विशेष प्रतिनिधी

मुंबई :  ठाकरे-पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात अनेक आरोप केले आहेत. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतली आहे.

वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.माझे आरोप खोटे ठरवून दाखवा, मलिकांचं वानखेडे कुटुंबियांना आव्हान

मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.

NAWAB MALIK:… So I will leave politics – I will leave the ministry; Public role of Nawab Malik in Sameer Wankhede case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती