मुंबईसह उपनगरामध्ये राहणाऱ्या कामगारांसाठी लोकल ट्रेन म्हणजे जीवनवाहिनी आहे.परंतु कोरोनामुळे लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती.Give us a train ticket, otherwise we will get off the rails and agitate; RPI warning
विशेष प्रतिनिधी
कल्याण : रेल्वे तिकीट द्या नाहीतर रुळावरून उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनवणे व शहराध्यक्ष संतोष जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर केदारे यांनी दिला आहे.
मुंबईसह उपनगरामध्ये राहणाऱ्या कामगारांसाठी लोकल ट्रेन म्हणजे जीवनवाहिनी आहे.परंतु कोरोनामुळे लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती.त्यामुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झाली.
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर सरकारने लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा पास घेण्यास परवानगी दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे तिकीट मिळत होते, मात्र अचानक त्यांना देखील तिकीट देणं बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
त्यामुळे सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देत रेल्वे तिकीट द्यावे अशी मागणी करत आरपीआय कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशनवर घोषणाबाजी करत निवेदन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App