“हर घर दस्तक”; देशभर घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम धनवंतरी जयंतीपासून सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना विरोधात आक्रमक पावले उचलत देशभर मोफत लसीकरण घडवून आणले. आता त्याच्या पुढचे पाऊल टाकत “हर घर दस्तक” या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.Knock Every House”; The door-to-door vaccination campaign started from Dhanwantari Jayanti across the country

आठ दिवसांपूर्वी भारतात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे कोरोनाला अटकाव झाला. आता येत्या धन्वंतरी जयंती पासून म्हणजे 2 नोव्हेंबर पासून देशातले जे जिल्हे लसीकरणाच्या मोहिमेत थोडे पिछाडीवर आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये “हर घर दस्तक” ही मोहीम राबवण्यात येणार आहे. याचा अर्थच घरोघरी जाऊन सरकारी वैद्यकीय कर्मचारी लसीकरण करणार आहेत.



केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी याचे सूतोवाच केले होते. कोणत्याही स्थितीत देशाला 100% लसीकरण पूर्ण करायचे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिवाळीतला धनत्रयोदशीचा म्हणजे आरोग्य देवता धन्वंतरी जयंतीचा दिवस निवडून त्या दिवसापासून साधारण महिनाभर लसीकरणाची मोहीम घरोघरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून उर्वरित लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Knock Every House”; The door-to-door vaccination campaign started from Dhanwantari Jayanti across the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात