विशेष प्रतिनिधी
अयोध्या : त्रेतायुगात रावणानं (Ravana) माता सीतेचं (Mata Sita) अपहरण करून तिला लंकेतील (Sri Lanka) अशोक वाटिकेत ठेवलं होतं. त्या ठिकाणच्या अशोक वाटिकेतल्या शिळा घेऊन श्रीलंकेचे राजदूत, उपराजदूत आणि दोन मंत्री आज 28 ऑक्टोबरला अयोध्येत (Ayodhya) पोहोचले आहेत. INDIA-SHRILANKA: This sign of Mother Sita reached Ayodhya directly from Ashok Vatika; Two Sri Lankan ministers-ambassadors-deputy ambassadors arrived in India
अशोक वाटिकेचे दगड रामलल्लाला अर्पण करण्यासोबतच श्रीलंकेचे राजदूत, उपराजदूत आणि दोन मंत्री श्रीरामाचे दर्शन घेतील. तसंच आरतीही करतील. श्रीलंकेचे राजदूत, उपराजदूत आणि दोन मंत्री दुपारी रामजन्मभूमी संकुलात श्रीलंकेतील अशोक वाटिकेचे दगड भगवान रामाला समर्पित करतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) सदस्य राजा अयोध्येतील राज सदन इथं श्रीलंकेचे राजदूत आणि श्रीलंका सरकारच्या मंत्र्यांचं स्वागत करतील.
प्रभू रामाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी पायाभरणी झाली आहे आणि वरती मंदिराचा पाया बांधला जात आहे. आता रावणानं हरण केल्यानंतर माता सीतेला ठेवलेल्या अशोक वाटिकेचे दगड घेऊन श्रीलंकेचे दोन राजदूत आणि मंत्री अयोध्येत पोहोचतील. हे दगड रामलल्लाला समर्पित केले जातील. दगडांचा वापर कुठं केला जाईल, हे ट्रस्टनं अद्याप स्पष्ट केलं नसलं तरी श्रीलंकेशी अयोध्येचा अध्यात्मिक संबंध नक्कीच असेल.
श्रीलंकेच्या राजदूतांचं ट्रस्टकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांचं अयोध्येतील राजाच्या निवासस्थानी स्वागत आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. असा आहे कार्यक्रम श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, भारतात राहणारे श्रीलंकेचे राजदूत आणि उपराजदूत आणि श्रीलंका सरकारचे दोन मंत्री अयोध्येला भेट देत आहेत. श्रीलंकेतील अशोक वाटिका, जिथं माता सीतेचं वास्तव्य होतं, त्या मंदिर परिसरातील दगड आणले जात आहेत. हे खडक लंका समाजाचं प्रतिनिधित्व करतील.
श्रीलंकन समाजाच्या भावनांचं सादरीकरणही होणार आहे. सर्व निमंत्रित 28 ऑक्टोबरला अयोध्येला पोहोचतील रामजन्मभूमीकडे जातील. प्रभू रामलल्लाचं दर्शन घेतील. शिळांचं समर्पण करतील आणि रामलल्लाची आरती करतील.
श्रीलंका सरकारचे राजदूत आणि दोन्ही मंत्री श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य राजा विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांच्या निवासस्थानी दुपारचं भोजन करतील आणि येथे पत्रकार परिषदेलाही संबोधित करतील. 1:30 वाजता राजदूत, उप राजदूत आणि श्रीलंका सरकारचे दोन्ही मंत्री लखनऊला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App