जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली याचा धागा पकडत काल जिल्हा मध्यवर्ती बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार उदयनराजेंनी पाहिली प्रतिक्रिया देत बँकेच्या संचालक मंडळावर आणि कामकाजावर टीका केली आहे. MP Udayanraje Bhosale Criticizes Ajit Pawar in Satara
विशेष प्रतिनिधी
सातारा : जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली याचा धागा पकडत काल जिल्हा मध्यवर्ती बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार उदयनराजेंनी पाहिली प्रतिक्रिया देत बँकेच्या संचालक मंडळावर आणि कामकाजावर टीका केली आहे.
उदयनराजे म्हणाले की, सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मालकीच्या असतात. कुठल्याही व्यक्तीमुळे ही बँक नाही. मी दबाव टाकून बँकेत आलेलो नाही. लोकांनी त्यांच्या पैशांची देखरेख करण्यासाठी मला बँकेत पाठवलं आहे.. मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही.. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार का केला नाही? जरंडेश्वर कारखाना गुरू कमोडिटीच्या ताब्यात आहे मात्र याचा गुरू कामोडीटीचा गुरू कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. कारखाना कुणाच्या मालकीचा आहे असा सवाल उपस्थित पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या ते पुन्हा सहकारात कसे काय? ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीत काढल्या त्यांनी 10 तारखेच्या आत फॉर्म माघारी घ्यावे माझी पण माघार असेल असे सांगत आमदार शिवेंद्रराजे यांच्या मोडकळीत आलेल्या अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेवर निशाण साधत शिवेंद्रराजेवर नाव न घेता टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App