दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.Diwali for ST employees will be sweet; ‘This’ gift given by the government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सणासुदीच्या काळात नेहमीच शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून बोनस, महागाई भत्ता दिला जात असतो. आता एसटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
दिवाळीची भेट म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (#ST) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री @advanilparab यांनी केली. pic.twitter.com/owJ6t6BZlt — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 25, 2021
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (#ST) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री @advanilparab यांनी केली. pic.twitter.com/owJ6t6BZlt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 25, 2021
एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App