वृत्तसंस्था
श्रीनगर: गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) जम्मू-काश्मीरच्या (Jammu kashmir) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते जम्मूत दाखल झाले.आज त्यांच्या दौर्याचा तीसरा दिवस आहे.Amit Shah gave a number to a person living on the India-Pakistan border
शाह यांनी रविवारी सायंकाळी आरएसपुरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेलाही (India-Pakistan border) भेट दिली. जम्मूला लागून असलेल्या मकवालमध्ये त्यांनी बीएसएफच्या चौकीवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला आणि येथील स्थानिक लोकांसोबत चहाही घेतला.
यावेळी, गृहमंत्री शाह यांनी मकवाल येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही, तर गृहमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाही आपला नंबर देत, जेव्हा केव्हा आवश्यकता वाटेल, तेव्हा आपण कॉल करू शकता, असेही त्यांना सांगितले. यावेळी शहा यांनी या लोकांसोबत चहा घेतला आणि बाजेवर बसून बराच वेळ चर्चाही केली.
#WATCH | J&K: Union Home Minister Amit Shah takes the contact number of a local resident of Makwal border in Jammu, shares his own and tells him that the man can contact him whenever he needs. The Home Minister visited the forward areas of Makwal border today. pic.twitter.com/KJnI9zEsSD — ANI (@ANI) October 24, 2021
#WATCH | J&K: Union Home Minister Amit Shah takes the contact number of a local resident of Makwal border in Jammu, shares his own and tells him that the man can contact him whenever he needs.
The Home Minister visited the forward areas of Makwal border today. pic.twitter.com/KJnI9zEsSD
— ANI (@ANI) October 24, 2021
तत्पूर्वी, जम्मूच्या भगवती नगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करणे आणि नागरिकांच्या हत्या थांबविणे, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हृदयात स्थान असलेल्या या केंद्रशासित प्रदेशातील शांतता आणि विकासाला कुठल्याही स्थितीत आणि कुणालाही खीळ बसवू देणार नाही, असेही शाह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App