विशेष प्रतिनिधी
मुंबई – कर्णबधिर बाळांमध्ये पुन्हा ऐकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’ जे. जे. रुग्णालयात पुन्हा सुरू करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी दोन वर्षांच्या एका चिमुकलीवर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोनामुळे वर्षभरापासून ही शस्त्रक्रिया बंद होती.JJ hospital starts new surgery on Ear
खासगी रुग्णालयात ‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’साठी साधारण आठ ते दहा लाख रुपये मोजावे लागतात; पण जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया विनामूल्य होते.राज्यात साधारणत: ३९ हजार मुले कर्णबधिर आहेत;
तर देशाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जन्माला आलेल्या एक हजार मुलांमध्ये दोन मुले कर्णबधिर असतात. वेळेत दोष लक्षात न येणे, सर्जरीचा अवाढव्य खर्च, पालकांची आर्थिक स्थिती या कारणांमुळे शस्त्रक्रिया करण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे मुले कर्णबधिर राहतात.
कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया अंत्यत गुंतागुंतीची असून यात कानाचा भाग तसेच मेंदूचा काही भाग उघडून शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान चेहऱ्याकडील नस व मेंदूकडील नस यांची हानी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अत्यंत सावधपणे उपकरण कानात लावावे लागत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App