फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे वाहन चालकांना परवडेल अशा दरात इंजिन मिळणार आहे.फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे लोक १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील,असे गडकरी यांनी म्हटले.Flex Fuel Engine: ‘Flex Fuel Engine’ mandatory for every vehicle in the next six months; Nitin Gadkari gave general relief
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे.इंधन दरवाढीला वैतागलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. येत्या सहा महिन्यात देशातील सर्व वाहनांना फ्लेक्स इंजिन अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.दिल्लीतील फेडरेशनच्या ग्रीन एनर्जी अवॉर्ड कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे वाहन चालकांना परवडेल अशा दरात इंजिन मिळणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीनी शंभरी ओलांडल्याने सर्वसमान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. इंधनांच्या वाढत्या किंमती त्यांना न परवडणाऱ्या आहेत. येणाऱ्या दिवसात मी लवकरचं याबाबत आदेश जारी करणारआहे.
देशात येणाऱ्या सहा महिन्यात केवळ पेट्रोल डिझेल इंजिन नाही तर फ्लेक्स फ्यूएल इंजिनचा देखील वाहनांमध्ये समावेश असेल. फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे लोक १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील,असे गडकरी यांनी म्हटले.
फ्लेक्स फ्यूएल इंजिनमध्ये पेट्रोल आणि इथेनॉल किंवा मेथनॉलच्या मिश्रणाचा देखील वापर करण्यात येतो. या इंजिनमध्ये Fuel Misture Sensor चा देखील वापर करण्यात येतो. फ्लेक्स फ्यूएल इंजिनचा वापर सध्या ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये देखील केला जात आहे.
इंधनाला पर्याय म्हणून फ्लेक्स फ्यूएल इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लेक्स-फ्युएल इंजिन हे इथेनॉल, सीएनजी आणि बायो सीएनजी या पर्यायांवर चालणारं असेल. पुढील १५ वर्षात भारतीय वाहन उद्योगाचं मूल्य १५ लाख कोटी इतकं असेल असं म्हटलं.
दरम्यान गडकरींनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको तसंच लवकरच संपूर्णपणे ‘इथेनॉल’वर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले जाईल, असं सांगितलं होतं. यावेळी साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ‘हायड्रोजन गॅस’च्या निर्मितीत उतरावे असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App