प्रतिनिधी
मुंबई : अनन्या पांडेची शुक्रवारी एनसीबीकडून चार तास चौकशी झाली. बॉलीवुड मधील ड्रग्ज व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ही चौकशी होती. ती आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली. तिचे वडील चंकी पांडेही तिच्यासोबत एनसीबी कार्यालयात अनन्यासोबत हजर राहिले होते.Ananya Chanki Pande was questioned 4 hours on Friday by NCB
गोव्याला जाणाऱ्या क्रुझ मधील ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन शाहरूख खानसोबत अनन्याचंही नाव समोर आले होते. त्यामुळे एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. सोमवारी पुन्हा तिला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे एनसीबीचे महासंचालक अशोक जैन यांनी सांगितले.
अमली पदार्थ, एनसीबीचे छापे, स्टार कलाकारांच्या मुलामुलींची अटक या गोष्टींमुळे बॉलिवूड सध्या ढवळून निघाले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या तुरुंगात आहे. त्याच्या सोबत पार्टी करणारी चंकी पांडेची मुलगी अनन्यासुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनन्या 21 वर्षांची असून तीही बॉलीवुड अभिनेत्री आहे.
गुरूवारी एनसीबीचे अधिकारी अनन्याच्या घरी धडकले. शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावरही एनसीबीचे पथक गेले होते. अनन्या ही आर्यन खानची मैत्रीण असल्याचे सांगितले जाते. आर्यनचे काही व्हॉट्सअॅप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत.
क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे चॅट एनसीबीला मिळाले असल्याचे सांगितले जाते. या चॅटमध्ये नशिल्या पदार्थांबाबत बोलणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अभिनेत्री अनन्या पांडे असल्याची चर्चा आहे. यामुळे अनन्या पांडेची चौकशी एनसीबी कडून सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App