ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ बाळगणे, त्याच्याशी संबंधित षडयंत्र, त्याचा वापर, खरेदी आणि तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. Aryan Khan Drugs Case Aryan will remain in jail till October 26 NCB notice on Mannat Read in Details
वृत्तसंस्था
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ बाळगणे, त्याच्याशी संबंधित षडयंत्र, त्याचा वापर, खरेदी आणि तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. बुधवारी, विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह उर्वरित आरोपींची जामीन याचिका फेटाळली, त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करून ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले.
Drugs on cruise ship case | Bombay High Court to hear Aryan Khan's bail application on 26th October, Tuesday, says his lawyer pic.twitter.com/12mr2BGrDj — ANI (@ANI) October 21, 2021
Drugs on cruise ship case | Bombay High Court to hear Aryan Khan's bail application on 26th October, Tuesday, says his lawyer pic.twitter.com/12mr2BGrDj
— ANI (@ANI) October 21, 2021
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची टीम आज मन्नत येथील शाहरुख खानच्या घरी पोहोचली. NCBचे अधिकारी शाहरुख खानच्या घरी नोटीस देण्यासाठी गेले. या नोटीसमध्ये असे लिहिले होते की, आर्यन खानकडे इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्यास ते NCBला सोपवावे. एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग शाहरुखच्या घरी गेले. त्यांच्या मते, तपासाशी संबंधित काही कागदोपत्री काम बाकी होते, जे ते पूर्ण करत आहेत.
शाहरुख खान आज आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला. काचेच्या भिंतीसमोर बसून इंटरकॉमद्वारे दोघे बोलले. यादरम्यान आर्यन आपल्या वडिलांना पाहून रडत होता. ही भेट केवळ 15 मिनिटांसाठी होती.
Mumbai | Narcotics Control Bureau (NCB) team leaves from 'Mannat', the residence of actor Shah Rukh Khan pic.twitter.com/hHVWuunOgs — ANI (@ANI) October 21, 2021
Mumbai | Narcotics Control Bureau (NCB) team leaves from 'Mannat', the residence of actor Shah Rukh Khan pic.twitter.com/hHVWuunOgs
20 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयाने क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यनच्या वकिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या वकिलांनी न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांब्रे यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालय 26 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी करणार आहे. याचा अर्थ आर्यनला 26 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.
बॉलिवूडच्या उदयोन्मुख अभिनेत्रीसोबत आर्यनशी झालेल्या गप्पाही समोर आल्या आहेत. या गप्पांमध्ये ड्रग्जविषयी संभाषण झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे आहे. कोर्टात चर्चेदरम्यान, एनसीबी टीमने कोर्टात सुपूर्द केलेल्या आरोपींच्या गप्पांमध्ये या अभिनेत्रीसोबत आर्यनच्या गप्पांचाही समावेश आहे. आर्यनच्या विरोधात आतापर्यंत एनसीबीचे सर्व युक्तिवाद प्रामुख्याने व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित आहेत.
एनसीबच्या टीमने गुरुवारी मुंबईतील अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. तपास संस्थेने अनन्या पांडेला समन्स बजावले आहे. तिला आजच दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीने हे स्पष्ट केले नाही की, अनन्याला आरोपी म्हणून बोलावले की प्रत्यक्षदर्शी म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीच्या टीमने अनन्याच्या घरातून फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. एनसीबीने या वस्तू त्यांच्यासोबत घेतल्या आहेत. अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App