विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : घोडेस्वारीच्या स्पर्धा जिंकता जिंकता त्याने बिल गेट्सच्या मुलीचे प्रेम जिंकण्याची किमया करून जगातील सर्वात श्रीमंताचा जावई एक इजिप्तचा तरुण बनला आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेस्ट यांची मुलगी जेनेफर गेट्सनं हिने इजिप्शियन मूळ असलेल्या नाएल नासरशी विवाह केला आहे.He won the love of Bill Gates’ daughter by winning a horse race
नाएल नासर मुळचा इजिप्तचा आहे. मात्र त्याचा जन्म शिकागोमध्ये झाला. बालपण त्याच्या आई-वडिलांसोबत कुवैतमध्ये गेलं. त्याच्या पालकांनी कुवैतमध्ये आर्कीटेक्चर फर्म विकत घेतली आणि तिथंच स्थिरावले. नाएल उच्च शिक्षणासाठी २००९ मध्ये अमेरिकेमध्ये गेला. नाएलने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं आहे.
त्यानं २०१३ साली मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.नाएल आणि जेनिफर गेट्स यांची लव्ह स्टोरी या खेळांच्या आवडीतूनच पुढे सरकली. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या शर्यतीवेळी २०१६ मध्ये पहिल्यांदा जेनिफर आणि नाएल यांची ओळख झाली होती.
जेनिफर आणि नाएल या दोघांनाही घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. घोडेस्वारीची आवड असल्यानेच जेनिफर आणि नाएल दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले.नाएलला लहानपणापासूनच घोडेस्वारीची आवड आहे.
तो वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारी करतो. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यानं स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. नाएलने आपल्या देशासाठी घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. आता त्याने बिल गेट्स यांच्या मुलीचेही प्रेम जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App