विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जसा भाजपचा विजयरथ रोखला, तसा तो निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रातही रोखता येईल का?, अशी शक्यता पडताळण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असल्याची माहिती आहे. देशात भाजपचा विजय रथ प्रदेशिक पक्ष रोखू शकतात, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले आहे, अशी वक्तव्ये अनेकदा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर त्याही पुढे जात दसरा मेळाव्यात बोलताना येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये पश्चिम बंगला पॅटर्न राबवण्याची तयारी ठेवा, असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्वाच्या पक्षांचे बंगाल पॅटर्नवर एकमत झाल्यानंतर शरद पवार यावर पुढील चर्चा करण्यासाठी आज सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. Thackeray – Pawar for bengal political pattern in Maharashtra
उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेनाप्रमुखाना शब्द दिल्यामुळे मुख्यमंत्री पद स्वीकारल्याचे म्हटल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत ‘उद्धव यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली’, असे म्हटले. त्यानंतर मात्र एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचा खुलासा करत ‘माझ्या आग्रहाखातर ठाकरे मुख्यमंत्री बनले’, असे म्हणाले. अशा रीतीने ठाकरेंवरील आरोपाचे पवारांनी खंडन केल्यावर सोमवारी पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात ज्या प्रकारे भाजपावर टीकेचे अस्त्र उगारले, हे पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आणखी बिकट बनली आहे. म्हणूनच शरद पवारांनी आता याला पुढची दिशा देण्याची योजना आखून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी बनवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल का? पश्चिम बंगालमध्ये जसा भाजपचा विजयरथ रोखण्यात आला, तसा तो निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रातही रोखता येईल का?, अशी शक्यता पडताळण्यासाठी पवार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपाची काहीही शक्ती नव्हती, तिथे भाजपा क्रमांक २ चा पक्ष बनणे, हा भाजपचा पराजय म्हणता येणार नाही, असा खुलासा याआधीही भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा पश्चिम बंगालशी संबंध लावता येणार नाही, असे भाजप मधल्या सूत्रांचे मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App