विशेष प्रतिनिधी
मुंबई – सध्या मुंबईला कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याने डॉक्टरांसह प्रशासनासाठी हा तयारीचा काळ ठरत आहे. तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेने सहा जम्बो कोविड केंद्रे तयार करून ठेवली आहेत. रुग्णवाढ झाल्यास या केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. पुढील काही दिवस महापालिका परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.BMCC ready for combating third wave
तिसऱ्या लाटेसाठी दहिसर, नेस्को गोरेगाव, बीकेसी, एनएससीआय वरळी, मुलुंड, रिचर्डसन अँड क्रुडास भायखळा अशी सहा जम्बो कोविड सेंटर तयार ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी १६ हजार खाटा उपलब्ध आहेत.
याशिवाय मालाड आणि कांजूरमार्ग या ठिकाणची जम्बो कोविड सेंटरही पालिकेच्या ताब्यात आली आहेत; तर चुनाभट्टी येथेही सेंटर तयार होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबईत लसीकरणाचा वेग उत्तम असल्याने सध्या कोविडच्या लाटेचा धोका नाही.
गणपतीनंतर कोविडचे रुग्ण वाढण्याचा धोका होताच मात्र त्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबरोबरच इतर काही निर्बंधांतही शिथिलता देण्यात आली आहे. सध्या तरी रुग्णवाढीचा दर वाढलेला नाही. त्यामुळे तूर्तास धोका नसल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App