पूजा बेदीने दर्शवला शाहरुख खानला सपोर्ट! आर्यन जवळ ड्रग नाही मिळाले तट अटक का? – पूजा बेदी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलाला म्हणजे आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज केसमध्ये ताब्यात घेतले आहे. त्याला 20 ऑक्टोबरपर्यत मुंबई येथील आर्थर रोड वरील जेलमध्येच रहावे लागणार आहे. कारण आर्यनने दिलेल्या जामिन अॅप्लिकेशन कोर्टाकडून नामंजूर करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी कार्नेलिया क्रूझ ड्रग पार्टी मधील छाप्यात आर्यन याला ताब्यात घेण्यात आले होते. या सर्व प्रकरणामध्ये बऱ्याच बॉलीवूडमधील कलाकारांनी शाहरुख खानला आपला सपोर्ट दर्शवला होता. बऱ्याच लोकांनी ट्वीट करुन आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत आपला सपोर्ट दर्शवला आहे.

Actress Pooja Bedi supports Srk

तर अभिनेत्री पूजा बेदीने देखील आता शाहरुख खानला सपोर्ट करणारे एक ट्वीट केले आहे. ती आपल्या ट्वीटमध्ये लिहिते की, जर आर्यन जवळ कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाहीयेत तर एका निर्दोष मुलाला तुम्ही तुरुंगामध्ये का दिवस घालण्यास भाग पाडत आहात? हे सर्व चित्र भयानक नाही का? असा प्रश्न तिने आपल्या ट्विट मधून विचारला आहे. विनाकारण एखाद्या व्यक्तीस तुरुंगांमध्ये टाकणे म्हणजेच एखाद्याला मानसिक हानी पोहोचवणे हेच आहे. आता न्यायव्यवस्थेमध्ये या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा यंत्रणा निर्दोष लोकांना शिक्षा देऊन गुन्हेगार निर्माण करण्याचे काम करतात’ असं देखील पूजाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


AARYAN KHAN : आर्यन खानचा समीर वानखेडेंना ‘वादा’ : ‘तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करेन’…


पूजा बेदी ही एक यशस्वी अभिनेत्री असून तिने जो जिता वही सिकंदर, साक्षी, मसाबा मसाबा अशा अनेक सीरिजमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Actress Pooja Bedi supports Srk

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात