जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना जात पडताळणी विभागाचा उपायुक्त रंगे हात सापडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात ही कारवाई केली. While taking a bribe of Rs 2 lakh, the Deputy Commissioner of Caste Verification was caught red handed
विशेष प्रतिनिधी
पुणे : जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना जात पडताळणी विभागाचा उपायुक्त रंगे हात सापडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात ही कारवाई केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपआयुक्त आहेत. ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता.
नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. ढगे यांच्या राहत्या घरा जवळ मध्यरात्री सापळा लावण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App