विशेष प्रतिनिधी
ललितपूर – ललितपूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह सात जणांना अटक केली आहे. आरोपीत पीडित मुलीच्या वडिलांचा देखील समावेश असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. बसपचा नेता दीपक अहिरवार, सपचा नेता तिलक यादव आणि एक अभियंता महेंद्र दुबे अशी आरोपींची नावे आहेत. Seven people arrested for rape incident
उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील १७ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ वर्षीय पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. गेल्या पाच वर्षांपासून तिच्यावर वडिलांकडून अत्याचार केले जात होते. त्याचबरोबर पित्याने तिला अनेकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. यात समाजवादी पक्षाचे नेते, बसपचे नेते आणि अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी याप्रकरणी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत. त्याचवेळी आणखी तीन अज्ञात लोकांविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या घराला आणि परिसराला संरक्षण दिले आहे. दरम्यान, बलात्कार प्रकरणात बसप आणि सप नेत्यांची नावे आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन केले. भाजपकडून कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App