विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जवळपास मागील एका वर्षापासून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये कालचा दिवस खूप दुखद होता. सिंधू सीमेरेषेवर लखबीर सिंह या पंजाबच्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह तेथे असणाऱ्या बॅरिकेटला बांधण्यात आला होता. मृत व्यक्ती निहंग समूहा मधील असल्याचे तपासा दरम्यान स्पष्ट झाले होते. मृत व्यक्तीने सरबलोह या धार्मिक ग्रंथाचा अपमान केल्याबद्दल त्यांची हत्या करण्यात आली होती. ह्या गुन्ह्याची जबाबदारी निहंग समूहाने घेतलेली आहे. मृत व्यक्ती मागील काही दिवसांपासून निहंग समूहात सोबतच राहत होता अशी देखील माहिती मिळाली आहे.
The protest is going on in a democratic and peaceful way, we opposes any kind of violence: Samyukta Kisan Morcha
पण शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आपली भूमिका या प्रकरणात स्पष्ट केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चा या हत्येची निंदा करतो. या घटनेतील निहंग समूह व मृत व्यक्ती दोघांचा संयुक्त किसान मोर्चासोबत कोणताही संबंध नाहीये. तसेच कोणत्याही धार्मिक ग्रंथांचा आणि त्यांच्या प्रतीकांचा अपमान करणे याच्या आम्ही विरोधातच आहोत.
Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल
त्याआधारे कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाला कायदा हातात घेण्याची परवानगी मिळत नाही. या हत्या आणि धार्मिक ग्रंथांच्या अपमानाची चौकशी करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा द्यावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने या वेळी केली आहे. त्याचसोबत ते असेही म्हणाले की, लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोधच करते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App