पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशातील ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या जागी 7 नव्या सरकारी संरक्षण कंपन्या समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. संरक्षण सज्जतेमध्ये देश स्वावलंबी होण्यासाठी 200 वर्षापेक्षा जास्त जुन्या आयुध निर्माणी मंडळाला सात स्वतंत्र घटकांमध्ये बदलण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. PM Narendra Modi’s Big Defence Move To “Make India World’s Biggest Military Power” PM Modi today dedicated 7 new state-run defence firms replacing the Ordnance Factory Board.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताला स्वावलंबी करण्यासाठी आणि देशाची संरक्षण सज्जता सुधारण्यासाठी 41 ऑर्डनन्स कारखाने 7 सरकारी संचालित कॉर्पोरेट घटकांमध्ये रूपांतरित होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 15) घोषित केले.
नव्या 7 संरक्षण फर्म लाँच करताना मोदी म्हणाले, “जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवण्याचे भारताचे ध्येय आहे.” “स्वातंत्र्यानंतर प्रथमच, भारताच्या संरक्षण क्षेत्रात अनेक मोठ्या सुधारणा आणल्या गेल्या. त्यात पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शकता आणि विश्वास आहे,” असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
दोनशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे रूपांतर सात नवीन सरकारी संरक्षण कंपन्यांमध्ये केल्यानंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताला संरक्षण उपकरणांचे प्रमुख उत्पादक म्हणून विकसित करण्यासाठी सिंगल-विंडो सिस्टीम लावली गेली आहे. ‘स्वावलंबी भारत’ मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःची जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे आणि भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास करणे हे देशाचे ध्येय आहे.” मोदी म्हणाले, “गेल्या सात वर्षांत देशाने ‘मेक इन इंडिया’ च्या मंत्राने हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App