वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. सलग सहा वर्ष भारत या परिषदेवर निवडून येत आहे. विशेष म्हणजे भारताची निवड एकमुखी आणि बहुमताने या परिषदेवर करण्यात आली आहे. India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेसाठी भारत २०२२- २०२४ या कालावधीसाठी कार्य करणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि लोकशाही राजवट असलेल्या भारताची या परिषदेवर निवड होणे जगाच्या दृष्टीने म्हत्वाची ठरणार आहे. मानवाधिकार हा विषय जगभर बोलला जातो. त्या दृष्टीने जगभरात मानवाधिकारचे रक्षण आणि अंमलबजावणी करण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकेल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App