प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोशल मीडियात सगळे नेते ऍक्टिव्ह झाल्यापासून दररोज त्यावर काय शेअर करायचे हा प्रश्न दररोजच्या दिवसांच्या शुभेच्छा व्यक्त करून काही नेत्यांनी सोडवला आहे. पण या शुभेच्छांची सगळीकडे धांदल उडाली असताना नेत्यांचा मात्र दिवसांचा गोंधळ होताना दिसतो आहे.Rush of good wishes, confusion of leaders; Happy dasera on the day of !!
आज असाच गोंधळा झाला. आज शारदीय नवरात्रीची महानवमी आहे. महाराष्ट्रात याला खंडेनवमी देखील म्हणतात. उत्तर भारतात याला महानवमी म्हणतात. परंतु, आजच्या महानवमीच्या दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तमाम जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा देऊन घेतल्या. यावरून सोशल मीडियामध्ये ते प्रचंड ट्रोल झाले.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येच्या कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते. त्यावरून त्यांचे संपूर्ण राजकारण फिरले होते. आज अखिलेश यादव यांनी महानवमीच्या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्यावर या मुद्द्यावरूनच जबरदस्त भडीमार झाला.
रामभक्तांवर गोळी चालवणार्याला महानवमी आणि रामनवमीतला फरक कळणार नाही, असे टोले अनेकांनी अखिलेश यादव यांना लगावले. ट्रोल झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्विट बदलून रामनवमीच्या ऐवजी महानवमी असे लिहिले.
अशीच धांदल काँग्रेसचे जी 23 मधले नेते आनंद शर्मा यांची झाली. परंतु त्यांनी आपली चूक वेळीच सुधारत रामनवमी ऐवजी महानवमीच्या शुभेच्छा देत आपली बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते देखील सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App