मेदिनीपुरच्या दुर्गा पूजा उत्सवात नेताजी सुभाषबाबूंसह अनेक क्रांतिकारकांचे स्मरण

वृत्तसंस्था

मेदिनीपुर : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध दुर्गा पूजा मंडपांमध्ये वेगवेगळ्या थीमवर आधारित देखावे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये भारत – बांगलादेश बॉर्डर, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारच्या योजना यांच्या सजावटी करण्यात आल्या आहेत. A Durga Puja pandal cherishes the memories of revolutionaries who stood up against British rule in Medinipur city in West Medinipur



त्यामध्ये सगळ्यात वेगळा ठरतो आहे तो मेदिनीपुरचा दुर्गा पूजा उत्सव. मेदिनीपुर हे एके काळी स्वातंत्र्यसैनिकांचे आगार होते. या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण यंदाच्या दुर्गापूजा महोत्सवात करण्यात आले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यापासून ते त्या वेळच्या अखंड बंगाल प्रांतातील विविध क्रांतिकारकांच्या आठवणी दुर्गापूजा मंडपात दाखविण्यात आल्या आहेत. क्रांतिकारकांची शेकडो दुर्मिळ छायाचित्रे मिळवून आयोजकांनी प्रदर्शनात मांडली आहेत.

भारतीय भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना त्याचे औचित्य साधून मेदिनीपुरच्या दुर्गा उत्सवने क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली आहे. या उत्सवाची सुरुवात 1934 क्रांतिकारकांच्या एका छोट्या गटाने केली होती. ती परंपरा आजही मेदिनीपुरमध्ये श्रद्धापूर्वक जपली जाताना दिसत आहे.

A Durga Puja pandal cherishes the memories of revolutionaries who stood up against British rule in Medinipur city in West Medinipur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात