केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच भाजपने विविध राज्यांतील 16 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. या जागांवर 30 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. bjp released its list of candidates for by polls to 3 lok sabha seats and 16 assembly seats
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच भाजपने विविध राज्यांतील 16 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. या जागांवर 30 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.
लोकसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार कोण?
भाजपने महेश गावित यांना दादरा आणि नगर हवेलीतून, ज्ञानेश्वर पाटील यांना मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडीमधून ब्रिगेडियर खुशाल ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.
देशातील तीन लोकसभा आणि 30 विधानसभा जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ज्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा रिक्त आहेत त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, मध्य प्रदेश- खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा यांचा समावेश आहे. यासह 14 राज्यांमधील 30 वेगवेगळ्या विधानसभा जागांवरही निवडणुका होणार आहेत.
कोणत्या राज्यांत विधानसभा निवडणुका
आंध्र प्रदेश – १, आसाम – ५, बिहार – ६, हरियाणा – १, हिमाचल प्रदेश – ३, कर्नाटक – २, मध्य प्रदेश – ३, महाराष्ट्र – १, मेघालय – ३, मिझोराम – १, नागालँड – १, राजस्थान – २, तेलंगणा – १, पश्चिम बंगाल – ४ जागांवर निवडणुका होऊ घातल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App