corona pandemic : कोरोनाच्या उत्पत्तीबाबतचे चीनने कितीही फेटाळले तरीही जागतिक पातळीवर चीनकडेच यासाठी बोट दाखवले जाते. कोरोनाच्या उगमाबद्दलची वक्तव्ये चीनने वेळोवेळी बदलली आहेत. आता एका नवीन खुलाशामुळे चीनची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक संशयास्पद झाली आहे. Australia-US joint firm reveals Double purchase of test kits from China before the onset of the corona pandemic
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोनाच्या उत्पत्तीबाबतचे चीनने कितीही फेटाळले तरीही जागतिक पातळीवर चीनकडेच यासाठी बोट दाखवले जाते. कोरोनाच्या उगमाबद्दलची वक्तव्ये चीनने वेळोवेळी बदलली आहेत. आता एका नवीन खुलाशामुळे चीनची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक संशयास्पद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या संयुक्त सायबर सिक्युरिटी फर्मने कोरोनाच्या चिनी संबंधाबाबत संशोधनाच्या आधारे दावा केला आहे. दाव्यानुसार, चीनने कोरोनाचे पहिले प्रकरण नोंदवण्याच्या तारखेच्या एक महिना आधी तेथील एका प्रांतात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी उपकरणे खरेदी केली होती.
सुरक्षा फर्म इंटरनेट -2.0 च्या मते, चीनच्या हुबेई प्रांतात 2019 मध्ये पीसीआर (पॉलिमर चेन रिअॅक्शन) चाचणी किटची मागणी अचानक वाढली. 2019 मध्ये हुबेई प्रांतात RT-PCR चाचण्यांवर 67.4 दशलक्ष युआन ($ 10.5 कोटी) खर्च झाले, हा आकडा 2018 मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या दुप्पट आहे. याला आपण RT-PCR चाचणीच्या नावानेही ते ओळखतो.
कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी ही सर्वात अचूक चाचणी मानली जाते. यामध्ये शास्त्रज्ञ डीएनए नमुन्यांची तपासणी करून संसर्ग शोधतात. हुबेईच्या वुहान शहरात बहुतेक चाचणी किट खरेदी केल्या गेल्या. या शहरातच कोरोनाचे पहिले प्रकरण सापडल्याचा दावा चीनने केला होता.
31 डिसेंबर 2019 रोजी चीनने जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) सांगितले की त्यांना वुहान शहरात न्यूमोनियाचे एक विचित्र प्रकरण सापडले आहे. 7 जानेवारी 2020 रोजी चीनने अधिकृतपणे कोरोना, सार्स-कोविड -2 किंवा कोविड -19 चे नवीन रूप आल्याची घोषणा केली.
काही शास्त्रज्ञांच्या मते, प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्राणघातक रोगप्रसारक विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर आला आणि हेच या साथीचे कारण ठरले. वुहानमधील ही प्रयोगशाळा हुनान सीफूड मार्केटपासून फार दूर नाही, जिथे कोरोनाचा कहर प्रथम दिसला होता. आतापर्यंत हा संसर्ग कोणत्याही वन्य प्राण्यामध्ये आढळला नाही आणि लॅबमधून व्हायरस लीक होण्याची शक्यता तपासण्यास चीन सरकारने नकार दिल्याने लॅबमधून संक्रमणाचा प्रसार सिद्धांत मजबूत होतो.
या वर्षी जानेवारीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या वुहान शहरात गेले होते. या पथकाने एप्रिलमध्ये आपला अहवाल दिला, पण या अहवालात नवीन काहीच नव्हते. तसेच कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत कोणताही निश्चित निष्कर्ष नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून ज्या गोष्टी घडत आहेत, त्याच गोष्टी अहवालात सांगितल्या गेल्या. अहवालात म्हटले होते की, चीनमधील लोकांना या विषाणूची लागण कशी झाली हे माहिती नाही. असे दिसते की हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये आला आहे. हा लॅबमध्ये तयार केल्याची शक्यता नाही. यानंतर डब्ल्यूएचओवर चीनच्या दबावाखाली अहवाल तयार केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
Australia-US joint firm reveals Double purchase of test kits from China before the onset of the corona pandemic
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App