बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.vishal got emotional when shivlila Patil came out of Bigg Boss, said – “She should have been, taught a lot.”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोरदार सुरुवात पहायला मिळत आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे.बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, ‘ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार.
ते असत ना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे’… मीनलने देखील सांगितले, ‘ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे… तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच.तिला इतक नॉलेज आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाहीये.
शिवलीला पाटील तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचं बिग बॉसनं म्हटलं होतं. बुधवारी (29 सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App