विशेष प्रतिनिधी
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फक्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कारण थेट गडकरींच्या कार्यालयातून पवारांना निमंत्रण दिले गेले आहे. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या अन्य कार्यक्रमांना फक्त नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांना त्या कार्यक्रमांचे निमंत्रण दिलेले नाही, असे खुलासे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत. Pawar will only attend Gadkari’s government program; Not of Vikhe Patil; Disclosure of the town’s program
४ राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे भूमिपूजन आणि लोकार्पण या कार्यक्रमाला नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. त्यावेळी शरद पवार गडकरींच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. याचे संयोजन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
विखे पाटील फाऊंडेशनचे आणि भाजपचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. त्या कार्यक्रमाला शरद पवारांना अर्थातच निमंत्रण नाही. तेथे फक्त नितीन गडकरी हे उपस्थित राहतील, असा खुलासा डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील आणि पवार घराण्यातील राजकीय वैराच्या पार्श्वभूमीवर पवारांची गडकरींच्या कार्यक्रमाला उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय झाली आहे. त्यातही 2019 नंतर राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यात भाजपची फोडाफोडी करून काही विखे-पाटील समर्थकांना आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही घराण्यांमधले राजकीय वैर अधिक तीव्र झाले आहे.
आता विखे पाटलांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध आहे. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरींनी शरद पवारांना नगर जिल्ह्यातल्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र निमंत्रण देणे याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App