Nitin Gadkaris MISSION KASHMIR : नितीन गडकरींनी केली अशक्यप्राय जोजिला बोगद्याची पाहणी ; आशियातील सर्वात लांब बोगदा ; दिल्ली-कश्मिर फक्त ८ तासांत…


  • जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये २ लाख कोटींचे महामार्ग प्रकल्प सुरू
  • जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम सुरुवात होत आहे. (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region). मेघा इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) हे या बोगद्याचं काम करत आहे.

वृत्तसंस्था

सोनमर्ग : श्रीनगर ते लेह दरम्यान वर्षभर दळणवळण सुरु ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा ‘झोजिला टनेल’ हा जम्मू – काश्मीरसह लडाखच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिक ठरणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते बांधणी व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोनमर्ग येथे दिली.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नितीन गडकरी यांनी 3,612 कोटी रुपये खर्चून बनवण्यात येणाऱ्या 121 किलोमीटरच्या 4 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करून, कामाला हिरवा झेंडा दाखवला.

आज दुसऱ्या दिवशी नितीन गडकरी यांनी आशियातील सर्वात मोठा बोगदा जेड-मोर ( Z-Mohr ) आणि जोजिला बोगदा (zojila tunnel) या कामांची पाहणी केली.

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यात जवळपास 33 किलोमीटर रस्ते बांधले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 18.5 किलोमीटर रस्त्याचं काम होईल. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 14.5 किलोमीटरचा जोजिला बोगदा बांधण्यात येणार आहे. यात 9.5 मीटर रुंदीच्या दोन पदरी रस्त्याचा समावेश असेल. तसेच बोगद्याची उंची 7.57 मीटर इतकी असेल. हा प्रकल्प पूर्ण करताना अनेक अडथळे येणार आहेत. त्यामुळे अत्यंत कल्पकपणे यावर काम केले जाणार आहे. MEIL ने 4 हजार 509.5 कोटी रुपयांची निविदा सादर करत हा प्रकल्प मिळवला. इतर कंपन्यांच्या निविदा अधिक किमतीच्या असल्याने MEIL ने यात आघाडी घेतली.

हा बोगदा पूर्ण झाल्यावर श्रीनगर -लेह-लडाख महामार्ग हिवाळ्यात जोरदार होणाऱ्या बर्फवृष्टी (Snowfall) दरम्यान बंद होणार नाही. यामुळे लडाखला जाणे सोपे होईल. लडाख यापुढे उर्वरित भारतापासून आता वेगळे राहणार नाही. यात 18 किमी लांबीचा रस्ता देखील तयार केला जाईल. झेड मोड बोगद्यांपासून झोजिला बोगद्यापर्यंत जाईल. या रस्त्यावर अशा हिमस्खलन संरक्षण संरचना बांधल्या जात आहेत. जे दोन बोगद्यांमधील हवामानातील संतुलन राखेल. झोजिला बोगदा का खास आहे हे जाणून घेवूया.

* कुतुबमिनारच्या 5 पट उंचीवर आहे बोगदा

झोजिला बोगदा आशियातील सर्वात लांब बोगदा असल्याचे म्हंटले आहे. या बोगद्याचा पाया 2018 मे मध्येच ठेवण्यात आला होता, परंतु IL&FSया निविदा कंपनीचे दिवाळे निघाले. त्यानंतर हैदरबादच्या मेघा अभियंतत्रीकीला कंत्राट देण्यात आले. ज्या ठिकाणी बोगदा बांधला जात आहे. तो कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच आहे. हा बोगदा झोजिला खिंडीजवळ सुमारे 3000 मीटर उंचीवर NH-1 येथे बाधला जात आहे.

* साडेतीन तासाचा प्रवास 15 मिनिटांमध्ये

हा बोगदा सुमारे 14. 15 किमी लांब आहे. हे आशियातील सर्वात लांब बोगदा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर जे अंतर कापण्यासाठी साडेतीन तास लागतात, ते अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण केले जातील.

* भारतीय लष्कराणांसाठी हा प्रकल्प महत्वाचा

हा बोगदा सामान्य जनतेसाठी आणि पर्यटकांसाठी तसेच भारतीय सैन्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर लडाख सर्व हंगामात काश्मीर खोऱ्याशी संपर्कात राहील. श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहचे क्षेत्र जोडलेले राहतील. या बोगद्याला महत्व असण्याचे कारण म्हणजे सैन्यासाठी हा रस्ता सियाचीनकडे जातो. आगामी काळात श्रीनगर-कारगिल-लेह या मार्गावर हिमस्खलनाची भीती राहणार नाही.

 

* अनेक सुरक्षा उपाय

  • बोगद्याच्या आत प्रत्येक 750 मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपत्कालीन ले-बाय असतील. कॅरेजवेच्या दोन्ही बाजूंना साइडवाक्स असतील.
  • युरोपीयन मानकांनुसार, बोगद्याच्या आत प्रत्येक 125 मीटरवर आपत्कालीन कॉलिंग सुविधा असेल.
  • संपूर्ण बोगद्यामध्ये स्वयंचलित फायर डिटेक्शन सिस्टम बसवली जाईल आणि मॅन्युअल फायर अलार्मसाठी सुद्धा एक बटन असेल.
  • बोगद्याच्या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूने खांब लावून कॅमेरे बसवले जातील.
  • सीसीटीव्ही फुटेज नियंत्रण कक्षाला पाठवले जातील.

Nitin Gadkaris MISSION KASHMIR: Nitin Gadkari inspects the almost impossible Jojila tunnel; The longest tunnel in Asia; Delhi-Kashmir in just 8 hours …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात